जबरदस्त फीचर्ससह येणाऱ्या लेटेस्ट Vivo V40 5G ची भारतात पहिली Sale आज, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

Updated on 19-Aug-2024
HIGHLIGHTS

लेटेस्ट Vivo V40 5G स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच

Vivo V40 5G फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 19 ऑगस्टपासून भारतात सुरू होणार

पहिल्या सेलदरम्यान या Vivo V40 5G स्मार्टफोनवर उत्तम डिस्काउंट ऑफर उपलब्ध असतील.

Vivo V40 5G हे प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चे नवीनतम स्मार्टफोन आहे, जो अलीकडेच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, या फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 19 ऑगस्टपासून भारतात सुरू होणार आहे. ही सेल ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होईल. या सेलदरम्यान या स्मार्टफोनवर उत्तम डिस्काउंट ऑफर उपलब्ध असतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन अनेक जबरदस्त फीचर्ससह येतो. चला तर मग जाणून घेउयात या फोनची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Raksha Bandhan 2024: बहीण-भावाच्या प्रेमाच्या सणाला ‘या’ WhatsApp मॅसेज, Video आणि Status द्वारे द्या शुभेच्छा!

Vivo V40 5G ची किंमत आणि ऑफर्स

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Vivo ने Vivo V40 5G अनेक व्हेरिएंट्समध्ये सादर केला आहे. या फोनचे 8GB + 128GB मॉडेल 34,999 रुपयांना, 8GB + 256GB मॉडेल 36,999 रुपयांना आणि टॉप व्हेरिएंट 12GB + 512GB मॉडेल 41,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. पहिल्या सेलदरम्यान, आघाडीच्या बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास या डिव्हाइसवर 3,700 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, या फोनवर नो-कॉस्ट EMI आणि 35,950 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

Vivo V40 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V40 5G मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनच्या स्क्रीनला HDR10+ चा सपोर्ट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात Qualcomm चे Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे. त्याबरोबरच, हा स्मार्टफोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल.

फोटोग्राफीसाठी, या नवीन फोनमध्ये 50MP मुख्य आणि 50MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे, तर सेल्फी घेण्यासाठी, 50MP ऑटो-फोकस फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. नवीन हँडसेटमध्ये फेस अनलॉकसह फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये 5500mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात Dual 4G VoLTE, 5G, Wi-Fi, GPS, Bluetooth, Glonass, QZSS आणि USB Type-C पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी स्पेक्स मिळतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :