50MP सेल्फी कॅमेरासह Vivo T3 Ultra 5G फोन भारतात लाँच! तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत? 

50MP सेल्फी कॅमेरासह Vivo T3 Ultra 5G फोन भारतात लाँच! तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत? 
HIGHLIGHTS

अखेर Vivo T3 Ultra 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

पहिल्या सेलमध्ये HDFC बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची झटपट सूट

Vivo T3 Ultra 5G फोनची विक्री 19 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Vivo च्या नव्या Vivo T3 Ultra 5G फोनच्या भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. आता अखेर Vivo T3 Ultra 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनद्वारे कंपनीने T सीरीजचा विस्तार केला आहे. हा नवा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट श्रेणीत सादर केला आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये Sony IMX921 सेंसर देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo T3 Ultra 5G फोनची भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: जबरदस्त AI फीचर्ससह भारतात दाखल होणार Infinix Zero 40 5G फोन, पहा लाँच डेट आणि सर्व तपशील

Vivo T3 Ultra 5G

Vivo T3 Ultra 5G ची भारतीय किंमत

Vivo T3 Ultra 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज बेस व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये इतकी आहे. त्याबरोबरच, या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये HDFC बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची झटपट सूट आणि 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध असेल.

Vivo T3 Ultra 5G फोन लुनार ग्रे आणि फ्रॉस्ट ग्रीन या दोन कलर ऑप्शन्ससह लाँच करण्यात आला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 19 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

Vivo T3 Ultra 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo च्या या Vivo T3 Ultra 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED 1.5K डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसरसह सज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo T3 Ultra 5G मध्ये 12GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह फोनची रॅम 24GB पर्यंत वाढवता येईल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या फोनला IP68 रेटिंग देण्यात आली आहे.

Vivo T3 Ultra 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी Vivo T3 Ultra 5G फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा रिअर कॅमेरा सेटअप आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस ऑटो फोकससह 50MP कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी, हा फोन 5500mAh बॅटरीसह येतो, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर चालतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo