लेटेस्ट Vivo T3 Ultra 5G ची पहिली Sale आज भारतात होणार सुरु, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 

लेटेस्ट Vivo T3 Ultra 5G ची पहिली Sale आज भारतात होणार सुरु, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 
HIGHLIGHTS

Vivo ने अलीकडेच Vivo T3 Ultra 5G फोन भारतात लाँच केला.

Vivo T3 Ultra 5G ची सेल Flipkart वर संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल.

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 3000 रुपयांची सूट उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच Vivo T3 Ultra 5G फोन भारतात लाँच केला आहे. त्यानंतर, आज या फोनची पहिली सेल आहे. ही सेल प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. पहिल्या सेलअंतर्गत तुम्हाला Vivo T3 Ultra 5G वर भारी सवलती आणि आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ घालवता जाणून घेऊयात Vivo T3 Ultra 5G ची किंमत, पहिल्या सेलमधील ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: नवीनतम Infinix Zero 40 5G भारतीय बाजारात लाँच! विशेष AI फीचर्ससह मिळेल फोटोग्राफीचा उत्तम अनुभव

Vivo T3 Ultra 5G ची किंमत

Vivo T3 Ultra 5G फोनच्या भारतीय किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. तर, फोनच्या 8GB+256GB आणि 12GB+256GB मॉडेलची किंमत अनुक्रमे 33,999 रुपये आणि 35,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर आणि 1,763 रुपयांची EMI देखील उपलब्ध आहे.

Vivo T3 Ultra 5G First Sale Today

Vivo T3 Ultra 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo च्या या Vivo T3 Ultra 5G स्मार्टफोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा Vivo स्मार्टफोन MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. हा प्रोसेसर या फोनची जलद प्रक्रिया सुनिश्चित करतो. फोनमध्ये 12GB RAM आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.

vivo t3 ultra 5g

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP OIS लेन्स आणि 8MP वाइड अँगल लेन्स आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, Vivo ने या T-Series मोबाईल फोनमध्ये 5500mAh ची मजबूत बॅटरी दिली आहे. तर, यात 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo