Vivo T3 Pro 5G फोनची आज भारतात पहिली Sale, मिड बजेट स्मार्टफोनवर मिळेल हजारो रुपयांची सूट 

Vivo T3 Pro 5G फोनची आज भारतात पहिली Sale, मिड बजेट स्मार्टफोनवर मिळेल हजारो रुपयांची सूट 
HIGHLIGHTS

अलीकडेच नवीन स्मार्टफोन Vivo T3 Pro 5G भारतात लाँच

आज म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी या Vivo T3 Pro 5G स्मार्टफोनचा पहिली सेल सुरु होणार आहे.

Vivo T3 Pro 5G स्मार्टफोनमध्ये मुख्य सेन्सर म्हणून 50MP Sony IMX882 लेन्स आहे.

Vivo ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Vivo T3 Pro 5G भारतात लाँच केला आहे. त्यानंतर, आज म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी या स्मार्टफोनचा पहिली सेल सुरु होणार आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. या कालावधीत फोनवर परवडणारी EMI आणि बँक डिस्काउंट सारख्या ऑफर उपलब्ध असतील. चला तर मग जाणून घेऊयात Vivo T3 Pro 5G ची किंमत, ऑफर्स आणि तपशील-

Also Read: लेटेस्ट POCO C65 स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

Vivo T3 Pro 5G फोनची पहिली सेल

Vivo ची नवीन T-सीरीज स्मार्टफोन Vivo T3 Pro 5G दोन स्टोरेज पर्याय 8GB + 128GB आणि 8GB + 128GB प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. फोनची किंमत 21,999 रुपये आणि 23,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 3000 रुपयांची बँक सूट आणि स्वस्त EMI उपलब्ध आहे.

vivo t3 pro 5g
vivo t3 pro 5g

Vivo T3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo T3 Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि 4500 nits च्या पीक ब्राइटनेस आहे. या फोनमध्ये Snapdragon 7 Gen3 सोबत 256GB इंटरनल स्टोरेज आणि 8GB रॅम आहे. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन आहे. तर, इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये अखंड कनेक्टिव्हिटीसाठी बॅटरी सेव्हर, ओवरनाईट चार्जिंग प्रोटेक्शन, ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

Vivo T3 Pro 5G confirmed to launch tomorrow in India

फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये मुख्य सेन्सर म्हणून 50MP Sony IMX882 लेन्स आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 8MP वाइड अँगल लेन्स उपलब्ध आहे. यात LED फ्लॅश लाईट देखील आहे. आकर्षक सेल्फी क्लिक करण्यासाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo