50MP मेन कॅमेरासह Vivo T3 Pro 5G भारतात दाखल, तुमच्या बजेटमध्ये येईल का नव्या फोनची किंमत? 

50MP मेन कॅमेरासह Vivo T3 Pro 5G भारतात दाखल, तुमच्या बजेटमध्ये येईल का नव्या फोनची किंमत? 
HIGHLIGHTS

Vivo ने नुकतेच Vivo T3 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला.

Vivo T3 Pro 5G फोन कंपनीने 25,000 रुपयांच्या आत सादर केला आहे.

Vivo T3 Pro 5G फोनवर 3000 रुपयांची बँक सवलत देखील दिली जाणार आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने Vivo T3 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे. हा नवीन फोन कंपनीने 25,000 रुपयांच्या आत सादर केला आहे. हा फोन या किमतीत अनेक पॉवरफुल फीचर्ससह सादर केला गेला आहे. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन कर्व AMOLED डिस्प्ले, 8GB रॅम आणि स्नॅपड्रॅगन चिपसेटसह 256GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे. जाणून घेऊयात Vivo T3 Pro 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: अखेर बहुप्रतिक्षित iPhone 16 सिरीजची लाँच तारीख उघड, काय मिळेल विशेष? पहा सर्व डीटेल्स

vivo t3 pro 5g
vivo t3 pro 5g

Vivo T3 Pro 5G ची भारतीय किंमत

Vivo T3 Pro 5G च्या नव्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर, त्याचे 8GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 3000 रुपयांची बँक सवलत देखील दिली जात आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची पहिली विक्री Flipkart वर 3 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल. Vivo T3 Pro 5G सँडस्टोन ऑरेंज आणि एमराल्ड ग्रीन या दोन कलर ऑप्शन्ससह येतो.

Vivo T3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo T3 Pro 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm चा Snapdragon 7 Gen3 प्रोसेसरसह येतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनच्या सिक्योरिटीसाठी, या हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, मोबाइल फोनमध्ये ब्लूटूथ, Wi-Fi, GPS, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Vivo T3 Pro 5G launch in India

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP Sony IMX882 लेन्स आणि 8MP वाइड-एंगल सेन्सर आहे. यात गोल आकाराचा एलईडी फ्लॅश लाइटही आहे. नवीन मोबाइल फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी क्लिक करण्यासाठी 16MP कॅमेरा आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5500mAh ची बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये सुपर बॅटरी सेव्हर आणि रात्रभर चार्जिंग संरक्षणाने सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo