प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ने TECNO POP 9 5G फोनचे नवीनतम हाय-एंड मॉडेल भारतात लाँच केले आहे. अमी तुम्हाला सांगतो की, कंपनीने हा स्मार्टफोन गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केला होता. मात्र, आता कंपनीने या फोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल लाँच केले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने हा फोन बजेट किमतीत लाँच केला आहे. जाणून घेऊयात TECNO POP 9 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: अगदी निम्म्या किमतीत मिळतोय Samsung Galaxy S23 FE फोन, 2025 सुरु होताच मोठी Price Cut!
TECNO POP 9 5G फोनचा नवीन 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. फोनचे नवे 8GB RAM+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांना उपलब्ध आहे. मेमोरी फ्युजनसह यात 8GB ऍडिशनल रॅम देखील मिळेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनच्या नवीन मॉडेलची विक्री भारतात 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यानंतर, तुम्ही Amazon India द्वारे हा फोन खरेदी करण्यास सक्षम असाल.
फोनच्या इतर मॉडेल्सच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,499 रुपये इतकी आहे. तर फोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. हा फोन Midnight Shadow, Azure Sky आणि Aurora Cloud कलर व्हेरिएंटमध्ये येतो.
TECNO च्या नव्या TECNO POP 9 5G फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 48MP Sony IMX 882 प्राथमिक कॅमेरासह अनेक AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत. फोनमध्ये रिंग LED फ्लॅशलाइट सुद्धा उपलब्ध आहेत. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये आता 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.