लेटेस्ट Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

लेटेस्ट Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

लेटेस्ट Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच

या दोन्ही फोनची विक्री 13 डिसेंबर 2024 पासून Amazon India वर सुरू होईल.

मर्यादित काळासाठी हे स्मार्टफोन्स विशेष लाँच प्राईससह मिळतील.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno चे नवीनतम फोल्डेबल स्मार्टफोन्स अखेर भारतात दाखल झाले आहेत. होय, लेटेस्ट Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने नुकताच या सिरीजचा टीझर रिलीज केला होता. त्यानंतर, आता हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत. या दोन्ही फोन्सची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon द्वारे केली जाईल. चला तर मग जाणून घेऊयात Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Realme GT 6T 5G वर 5000 रुपयांच्या Discount, पहा Best ऑफर

Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 ची किंमत

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno Phantom V Flip 2 ची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या PHANTOM V Fold 2 स्मार्टफोन 79,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, दोन्ही स्मार्टफोनची ही विशेष लाँच प्राईस आहे. या किमतीत हा स्मार्टफोन केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 13 डिसेंबर 2024 पासून Amazon India वर सुरू होईल. फ्लिप स्मार्टफोन कार्स्ट ग्रीन आणि रिपलिंग ब्लू कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे फोल्ड स्मार्टफोन मूनडस्ट ग्रे आणि ट्रॅव्हर्टाइन ग्रीन कलर पर्यायांमध्ये सादर केला गेला आहे.

Tecno Phantom V Fold 2

Tecno Phantom V Fold 2 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 7.85-इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.42 इंच लांबीचा अंतर्गत LTPO AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Octa Core MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसर आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 512GB इंटरनल स्टोरेज आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 2x ऑप्टिकल झूम आणि 20x डिजिटल झूमसह 50MP पोर्ट्रेट लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये फ्रंट ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 32MP मुख्य आणि 32MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, यात 5750mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W वायरलेस आणि 70W अल्ट्रा चार्जिंगला समर्थन देईल.

Tecno Phantom V Flip 2

Tecno Phantom V Flip 2 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.9-इंच लांबीचा मुख्य LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3.64 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. विशेष म्हणजे यात कव्हर स्क्रीन कस्टमाइज करण्याचा पर्याय देखील आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 8020 6nm प्रोसेसर उपलब्ध आहे. यात डॉल्बी ATMOS सपोर्टसह ड्युअल स्पीकर्स देण्यात आले आहेत.

 Tecno Phantom V Flip 2

त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50MP मुख्य आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 32MP कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फ्लिप स्मार्टफोनमध्ये 4720mAh बॅटरी आहे, जी 70W अल्ट्रा चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 6 आणि Bluetooth v5.3 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo