Latest Smartphones under Rs.7000: कमी किमतीत येतात अप्रतिम फीचर्ससह जबरदस्त स्मार्टफोन्स, बघा यादी

Updated on 13-Jun-2024
HIGHLIGHTS

Amazon वरून 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करा.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco, Redmi आणि Tecno फोन बजेट किमतीत उपलब्ध

बजेट स्मार्टफोन्सच्या कॅमेरामध्ये देखील AI कॅमेराचा सपोर्ट उपलब्ध

तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा आहे? पण बजेट कमी असल्यामुळे तुम्हाला स्वस्त दोन हवाय. तर, काळजी करू नका, तुम्ही Amazon वरून 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन Smartphones खरेदी करू शकता. होय, Amazon सेल दरम्यान फोनवर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर दिले जात आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही Poco, Redmi आणि Tecno फोन स्वस्तात ऑर्डर करू शकता. हे स्मार्टफोन्स कमी किमतीत अगदी पॉवरफुल फीचर्स ऑफर करतात. बघुयात यादी-

Also Read: Samsung Galaxy S24 FE फोन सर्वोत्तम कॅमेरासह होणार दाखल, लाँचपूर्वीच सर्व फीचर्स लीक

POCO C65

तुम्ही Amazon वरून 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह POCO C65 स्मार्टफोन केवळ 6,799 मध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Mediatek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. AI लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आहे. येथून खरेदी करा

TECNO POP 8

TECNO POP 8 स्मार्टफोनचे 8GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 6,899 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी हा फोन ऑक्टा-कोर T606 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. येथून खरेदी करा

Redmi A3

Redmi A3 स्मार्टफोनचे 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेल Amazon वर 6,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi च्या फोनमध्ये 6.71 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. उत्तम कार्यक्षमतेसाठी, हा फोन MediaTek Helio G36 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 8MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. Buy From Here

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :