Latest Smartphones under 25000: मिड बजेट रेंजमध्ये येतात OnePlus पासून ते Nothing पर्यंत नवीनतम Powerful स्मार्टफोन्स, बघा यादी। Tech News
25 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या लेटेस्ट स्मार्टफोन्सची यादी
OnePlus Nord CE 4 दोन व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध
Nothing Phone (2a) नेहमीच्या फोन्सपेक्षा अनोख्या पारदर्शक डिझाइनसह येतो.
2024 मध्ये अनेक जबरदस्त Smartphones प्रत्येक किंमत श्रेणीमध्ये लाँच करण्यात आले आहेत. तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे आणि चांगला मोबाईल शोधून कंटाळा आला आहे का? या रिपोर्टमध्ये आता तुम्हाला या सर्व गोष्टींचे समाधान मिळेल. कारण येथे आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या काही नवीनतम उत्कृष्ट स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. होय, आम्ही काही नवीनतम स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे, ज्यांची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग 25 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात येणारे जबरदस्त 5 स्मार्टफोन बघुयात-
Realme 12+ 5G
Realme 12+ 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या 8GB RAM+128GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. तर, 8GB RAM+256GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. सुरळीत कामकाजासाठी हा स्मार्टफोन MediaTek Dimension 7050 चिपसेटच्या सपोर्टसह येतो.
Nothing Phone (2a)
Nothing Phone (2a) नेहमीच्या फोन्सपेक्षा अनोख्या पारदर्शक डिझाइनसह येतो. यामध्ये तीन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह 6.7-इंच लांबीचा लवचिक AMOLED डिस्प्ले आहे.यात 50MP+50MP रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे.
OnePlus Nord CE 4 5G
OnePlus Nord CE 4 दोन देखील व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध आहे. फोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी तुम्हाला 26,999 रुपये खर्च करावे लागतील. हा हँडसेट Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरासह मागील कॅमेरा सेटअप आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.
Samsung Galaxy A34 5G
Samsung Galaxy A34 5G ची किंमत 24,499 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.60-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 8MP कॅमेरा आणि 5MP कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फीसाठी यात 13MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Poco X6 Pro
Poco X6 Pro च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 22,999 रुपये आहे. तर, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये निश्चित केली आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेट आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा Xfinity AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल. तर, आकर्षक सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile