अरे वा! 50MP च्या 4 कॅमेऱ्यांसह Vivo V30 Pro स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News 

अरे वा! 50MP च्या 4 कॅमेऱ्यांसह Vivo V30 Pro स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo ने V सिरीजमध्ये नवीन डिवाइस Vivo V30 Pro लाँच केला.

नवीन Vivo फोनमध्ये तब्बल 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP चा मेन रियर कॅमेरा आहे.

स्मार्टफोन ब्रँड Vivo ने आपल्या V सिरीजमध्ये नवीन डिवाइस Vivo V30 Pro लाँच केला आहे. लक्षात घ्या की, हा फोन सध्या इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला असून येत्या काळात भारतातही लाँच केला जाईल. लेटेस्ट स्मार्टफोनच्या विशेष स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Vivo फोनमध्ये तब्बल 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी हे फिचर महत्त्वाचे आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता फोनची किंमत आणि प्रमुख फीचर्स बघुयात.

हे सुद्धा वाचा: Infinix Smart 8 Plus ची इंडिया लाँच डेट कन्फर्म! 7000 रुपयांहून कमी किमतीत मिळेल अप्रतिम स्मार्टफोन।Tech News

Vivo V30 Pro ची किंमत

Vivo V30 Pro फोनची किंमत 89,99,000 इंडोनेशियन रुपये आहे. ही किंमत अंदाजे 47,550 रुपये इतकी आहे. ही किंमत फोनच्या 12GB + 512GB मॉडेलची असून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. इंडोनेशियन मॉडेलच्या किमतीच्या आधारे असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हा डिवाइस भारतात 45 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात येईल.

Vivo V30 and Vivo V30 Pro to launch in India
Vivo V30 and Vivo V30 Pro to launch in India

Vivo V30 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V30 Pro मध्ये 6.78-इंच लांबीचा 1.5K कर्व AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि HDR10+ सपोर्ट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Vivo ने या फोनमध्ये MediaTek चा Dimensity 8200 प्रोसेसर इन्स्टॉल केला आहे. हा फोन Android 14 OS वर चालतो, ज्यावर Funtouch OS 14 चा लेयर आहे. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP चा मेन रियर कॅमेरा आहे, हा Sony चा IMX920 सेन्सर आहे, जो OIS, LED फ्लॅश सारख्या फीचर्ससह येतो. त्याबरोबरच, या फोनमध्ये 50MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये तिसरा कॅमेरा म्हणून 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी 50MP चा ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo