Samsung Galaxy Unpacked Event 2024: मेगा इव्हेंटदरम्यान लाँच झाले नवे Samsung Galaxy Z Fold 6 आणि Flip 6, AI फीचर्ससह सुसज्ज
Samsung Galaxy Unpacked Event 2024 मध्ये लाँच झाले नवे जबरदस्त प्रोडक्ट्स
नवे फोल्डेबल स्मार्टफोन्स Samsung Galaxy Z Fold 6 आणि Samsung Galaxy Z Flip 6 लाँच
Samsung Galaxy Z Fold 6 आणि Samsung Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन Galaxy AI फीचर्सने सुसज्ज
Samsung Galaxy Unpacked Event 2024: गेल्या काही दिवसांपासून Samsung चा वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट Galaxy Unpacked Event 2024 ची चर्चा सुरु होती. हा इव्हेंट पॅरिसमध्ये आयोजित केला गेला आहे. या इव्हेंटमध्ये नव्या फोल्डेबल स्मार्टफोन्ससोबत कंपनीने Samsung Galaxy Ring, Samsung Galaxy Watch7, Samsung Galaxy Watch ultra, Galaxy Buds 3 सिरीज हे प्रोडक्ट्स देखील सादर केले आहेत. कंपनीने आपले नेक्स्ट जनरेशन फोल्डेबल स्मार्टफोन्स Samsung Galaxy Z Fold 6 आणि Samsung Galaxy Z Flip 6 लाँच केले आहेत.
Samsung Galaxy Z Fold 6 आणि Samsung Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन Galaxy AI सपोर्टने सुसज्ज आहेत. ज्यामध्ये तुम्हाला सर्कल टू सर्च, चॅट असिस्ट आणि नोट असिस्ट सारखे फीचर्स मिळतात. जाणून घेऊयात नव्या फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या किमती आणि सर्व तपशील-
Samsung Galaxy Z Fold 6 ची किंमत
Samsung ने Samsung Galaxy Z Fold 6 ची सुरुवातीची किंमत USD 1899.99 म्हणेजच अंदाजे (1,58,680 रुपये) निश्चित केली आहे. हा फोन नेव्ही, पिंक आणि सिल्व्हर शॅडो कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. Galaxy Z Fold 6 स्मार्टफोन आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. तर, फोनची खुली विक्री 24 जुलैपासून सुरू होईल.
Samsung Galaxy Z Flip 6 ची किंमत
Samsung ने Samsung Galaxy Z Flip 6 ला USD 1099.99 म्हणजेच अंदाजे (91,855 रुपये) सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. हा फोन ब्लू, मिंट, सिल्व्हर शॅडो आणि यलो कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. तर, फोनच्या 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $1,219 म्हणजेच अंदाजे (1,01,800 रुपये) आहे. Samsung Galaxy Z Flip 6 फोनचे प्री-बुकिंग देखील सुरू झाले आहे. या फोनची विक्री देखील 24 जुलैपासून सुरू होईल.
Samsung Galaxy Z Fold 6 चे फीचर्स आणि स्पेक्स
Samsung Galaxy Z Fold 6 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 7.6 इंच लांबीचा QXGA+ डायनॅमिक AMOLED 2X प्रायमरी डिस्प्ले आहे. तर, 6.3 इंच लांबीचा HD + डायनॅमिक AMOLED 2X कव्हर डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. परफॉर्मन्ससाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 2X ऑप्टिकल झूमसह 50MP प्रायमरी, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10MP टेलिफोटो सेन्सर 3X ऑप्टिकल झूमसह येतो.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये 10MP फ्रंट कॅमेरा आहे. एवढेच नाही तर, यात कव्हर डिस्प्लेवर 4MP अंडर-डिस्प्ले कॅमेरा प्रदान केला जाईल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची बॅटरी 4,400mAh असेल. या फोनमध्ये S पेन सपोर्ट देण्यात आला आहे.
Samsung Galaxy Z Flip 6 चे फीचर्स आणि स्पेक्स
Samsung Galaxy Z Flip 6 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. यासोबत, फोनमध्ये 3.4 इंच लांबीचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले आहे. याशिवाय, फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये Galaxy AI चे फीचर्स देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हे 2X झूमसह 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा समाविष्ट आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10MP कॅमेरा आहे. बॅटरीची यात 4000mAh बॅटरी देखील आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile