लेटेस्ट Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोन लाँच! जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स
Samsung ने दीर्घ प्रतीक्षेनंतर Samsung Galaxy S24 FE फोन लाँच केला आहे.
Samsung ने Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra देखील सादर केले आहेत.
Samsung Galaxy S24 FE 3 ऑक्टोबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने दीर्घ प्रतीक्षेनंतर Samsung Galaxy S24 FE फोन लाँच केला आहे. केवळ फोनच नाही तर, कंपनीने यासह Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra देखील सादर केले आहेत. फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी कंपनीने या फोनला IP86 रेटिंगसह लाँच केले आहे. यामध्ये कंपनीची इन-हाउस चिप उपलब्ध आहे. हा फोन अनेक भारी फीचर्ससह येतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Samsung Galaxy S24 FE फोनची किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: Lava Agni 3 Launch: देशी कंपनीच्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर, मिळणार आकर्षक फीचर्स
Samsung Galaxy S24 FE ची किंमत
The time has finally come. Presenting the all-new Galaxy S24FE, the powerhouse to your creativity and productivity is out now! Galaxy AI is here. Know more: https://t.co/z1sJlIMdrV.#GalaxyS24FE #GalaxyAI #Samsung pic.twitter.com/x4yuFS9i4O
— Samsung India (@SamsungIndia) September 27, 2024
Samsung Galaxy S24 FE फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत USD 649.99 म्हणजेच अंदाजे 54,355 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत USD 709.99 म्हणजेच अंदाजे 59,370 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे फोन 3 ऑक्टोबरपासून युरोप, अमेरिका आणि इतर काही बाजारपेठांमध्ये उपलब्ध होतील. ब्लू, ग्रेफाइट, ग्रे, मिंट आणि यलो या चार कलर ऑप्शन्समध्ये सादर केले गेले आहेत. Samsung Galaxy S24 FE ची भारतीय किंमतही लवकरच जाहीर केली जाईल.
Samsung Galaxy S24 FE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S24 FE फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Exynos 2400e SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित One UI 6.1 वर कार्य करेल. फोनमध्ये स्टिरीओ स्पीकर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह डॉल्बी ATMOS सपोर्ट आहे. स्मार्टफोनमध्ये 4700mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठीही सपोर्ट आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 8MP टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 10MP कॅमेरा आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये जनरेटिव्ह एडिट, पोर्ट्रेट स्टुडिओ, एडिट सजेशन्स आणि इन्स्टंट स्लो-मो फीचर आहेत. तसेच, यात गुगलवर सर्च करण्यासाठी सर्कल, इंटरप्रिटर, लाइव्ह ट्रान्सलेट आणि नोट असिस्ट यांसारखी आकर्षक फीचर्स देखील मिळतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile