प्रतीक्षा संपली! अखेर Redmi Note 14 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स 

प्रतीक्षा संपली! अखेर Redmi Note 14 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स 
HIGHLIGHTS

अखेर कंपनीने Redmi Note 14 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली.

कंपनीने Redmi Note 14, Redmi Note 14 Pro, आणि Redmi Note 14 Pro+ असे तीन स्मार्टफोन मॉडेल्स समाविष्ट केले.

Redmi Note 14 सिरीजची विक्री 13 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi Note 14 सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. आज अखेर कंपनीने Redmi Note 14 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने Redmi Note 14, Redmi Note 14 Pro, आणि Redmi Note 14 Pro+ असे तीन स्मार्टफोन मॉडेल्स समाविष्ट केले आहेत. यंदा Xiaomi ने मागील पिढीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणांचे आश्वासन दिले आहे. जाणून घेऊयात किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: भारीच की! Vivo V40 Pro 5G वर मिळतोय तब्बल 8000 रुपयांचा Discount, पहा सर्व ऑफर्स

Redmi Note 14 सिरीजची किंमत

Redmi Note 14 5G फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये, 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आणि या फोनच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Redmi Note 14 Pro series

Redmi Note 14 Pro 5G फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आणि 8GB+256GB च्या व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्याबरोबरच, Redmi Note 14 Pro + 5G फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये, 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आणि फोनच्या 12GB+512GB व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Redmi Note 14 5G सिरीजच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 13 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. या लाइनअपचे बेस मॉडेल Amazon वरून खरेदी केले जाऊ शकते. तर Pro आणि Pro Plus मॉडेल Flipkart वर उपलब्ध असतील. यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात Discount ऑफर्सदेखील मिळतील.

Redmi Note 14 सिरीजचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 14

Redmi Note 14 मध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, MediaTek Dimensity 7025 Ultra chipset द्वारे समर्थित आहे. सीरिजमधील बेस व्हेरिएंटमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि आणखी 2MP लेन्ससह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात 16MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 45W चार्जिंग सपोर्टसह 5,110mAh बॅटरी मिळेल.

Redmi Note 14 5G launching with super bright screen and triple rear camera

Redmi Note 14 Pro

Redmi Note 14 Pro मध्ये 6.67-इंच लांबीचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि Gorilla Victus 2 प्रोटेक्शन आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, MediaTek Dimensity 7300 Ultra चिपसेटने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, मागील बाजूस या फोनमध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP चा प्राथमिक सेन्सर, 8MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 45W चार्जिंग सपोर्टसह येते.

Redmi Note 14 Pro+

Redmi Note 14 Pro plus with AI support launch confirmed

फ्लॅगशिप Redmi Note 14 Pro+ मध्ये 6.67-इंच लांबीचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7s Gen 3 चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये देखील ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP टेलिफोटो लेन्स उपलब्ध आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 90W चार्जिंग सपोर्टसह 6,200mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo