50MP कॅमेरासह Redmi A4 5G ची भारतात आज पहिली सेल! बजेट स्मार्टफोनवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध 

50MP कॅमेरासह Redmi A4 5G ची भारतात आज पहिली सेल! बजेट स्मार्टफोनवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध 
HIGHLIGHTS

Redmi ने आपला नवा बजेट स्मार्टफोन अलीकडेच भारतीय बाजरात लाँच केला.

Redmi A4 5G ची पहिल सेल आज भारतीय बाजारात सुरु होणार

Jio वापरकर्त्यांना फोनच्या खरेदीवर 10GB डेटा आणि 10 OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन दिले जाईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने आपला नवा बजेट स्मार्टफोन अलीकडेच भारतीय बाजरात लाँच केला आहे. 10,000 रुपयांअंतर्गत म्हणजेच बजेट रेंजमध्ये येणारा हा कंपनीचा पहिला 5G स्मार्टफोन आहे. दरम्यान, आज 27 नोव्हेंबर रोजी भारतात या फोनची पहिली सेल सुरु होणार आहे. लेटेस्ट Redmi A4 5G ची पहिल सेल प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर दुपारी 12 वाजल्यापासून लाइव्ह असेल. या सेलदरम्यान स्वस्त फोन तुम्हाला आणखी स्वस्त दरात मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Redmi A4 5G ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Realme GT 7 Pro 5G: आता बिंदास करा अंडरवॉटर फोटोग्राफी! जबरदस्त स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, पहा किंमत

Redmi A4 5G
Redmi A4 5G

Redmi A4 5G ची किंमत

Redmi A4 5G च्या 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, या फोनचे 4GB + 128GB स्टोरेज मॉडेल 9,499 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. फोनचे दोन्ही व्हेरिएंट तुम्हाला 10 हजार रुपयांअंतर्गत मिळतील. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi A4 5G च्या टॉप मॉडेलवर 500 रुपयांची सूट मिळेल. तसेच, Jio वापरकर्त्यांना फोनच्या खरेदीवर 10GB डेटा आणि 10 OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन दिले जाईल. याव्यतिरिक्त, या फोनवर स्वस्त EMI देखील मिळेल.

Redmi A4 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi A4 5G मध्ये 6.88-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, कंपनीने या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसर दिला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 5G, ड्युअल सिम स्लॉट, WiFi, ऑडिओ जॅक, ब्लूटूथ, GPS आणि USB Type-C पोर्ट देण्यात आले आहेत.

Redmi A4 5G First Sale starts from today 12pm in India

या व्यतिरिक्त, फोटो क्लिक करण्यासाठी Redmi A4 5G मध्ये 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये LED लाईट उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा Redmi मोबाईल फोन 5160mAh च्या मजबूत बॅटरीसह येतो. यात 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo