अखेर बहुप्रतीक्षित Redmi A4 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

Updated on 20-Nov-2024
HIGHLIGHTS

Redmi A4 5G स्मार्टफोन अखेर भारतीय बाजरात लाँच

लेटेस्ट Redmi A4 5G स्मार्टफोनची किंमत 8,499 रुपयांपासून सुरू होते.

या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4s Gen 2 5G प्रोसेसर आहे.

Redmi A4 5G Launch: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Redmi A4 5G भारतीय बाजारात लाँच झाला आहे. हा फोन अगदी प्रत्येकाच्या बजेटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा फोन अनेक दिवसांपासून टेक विश्वात चर्चेचा विषय आहे. ज्या लोकांना कमी किंमतीत 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, त्यांच्यासाठी हा फोन एक चांगला पर्याय ठरेल. या फोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon च्या माध्यमातून केली जाणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Redmi A4 5G ची किंमत आणि सर्व तपशील जाणून घेऊयात.

Also Read: 32MP फ्रंट कॅमेरासह स्वस्तात OPPO Reno 11 5G खरेदी करण्याची संधी, पहा Best डील

Redmi A4 5G ची भारतीय किंमत

लेटेस्ट Redmi A4 5G स्मार्टफोनची किंमत 8,499 रुपयांपासून सुरू होते. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, 27 नोव्हेंबर 2024 पासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल. वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन लोकप्रिय इ-कॉमर्स साईट Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन स्टाररी ब्लॅक आणि स्पार्कल पर्पल या दोन कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.

Redmi A4 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi A4 5G स्मार्टफोनमध्ये 6.88 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा डिस्प्ले डोळ्यांच्या संरक्षणासह येतो. त्याबरोबरच, विशेष म्हणजे हा फोन प्रीमियम हॅलो ग्लास सँडविच डिझाइनसह येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4s Gen 2 5G प्रोसेसर आहे. फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5160mAh बॅटरी मिळेल. याशिवाय फोनमध्ये 8GB रॅम आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 4G व्हर्च्युअल रॅमचा समावेश आहे, तर फोनमध्ये 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. त्याबरोबरच, फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. फोनमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी या डिव्हाइसमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :