लेटेस्ट Redmi 14C 5G स्मार्टफोन भारतात लाँच! फक्त 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये मिळतील सर्वोत्तम फीचर्स
Redmi चा Redmi 14C 5G स्मार्टफोन भारतात अनेक दमदार फीचर्ससह लाँच
Redmi 14C 5G लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Flipkart द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Redmi 14C 5G फोनची विक्री 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने Redmi 14C 5G स्मार्टफोन भारतात अनेक दमदार फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. हा फोन अनेक कलर ऑप्शन्स आणि व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Redmi 13C 5G चे सक्सेसर म्हणून Redmi 14C 5G फोन आणला गेला आहे. जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
Also Read: Samsung Galaxy S25 Ultra: अपेक्षित लाँच तारीख, भारतीय किंमत आणि इतर सर्व तपशील, वाचा सविस्तर
Redmi 14C 5G ची भारतात किंमत
कंपनीने फोनचा 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह व्हेरिएंट 9,999 रुपयांना लाँच केला आहे. याव्यतिरिक्त, 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला एक 10,999 रुपयांना आणला आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेले टॉप व्हेरिएंट 11,999 रुपयांना आणले गेले आहे. Redmi 14C 5G लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Flipkart द्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा स्मार्टफोन स्टारगेझ ब्लॅक, स्टारडस्ट पर्पल आणि स्टारलाईट ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Redmi 14C 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Redmi च्या या नवीन बजेट रेंज 5G स्मार्टफोनमध्ये 6.88 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये 4nm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आहे. हँडसेट ग्लास बॅक डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Xiaomi Hyper OS वर चालतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत RAM सह 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP AI कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, कंपनीने Redmi 14C 5G स्मार्टफोनमध्ये 5160mAh बॅटरी दिली आहे, जी 18W चार्जिंग सपोर्टसह येते. एवढेच नाही तर, कंपनी फोनसोबत बॉक्समध्ये 33W चार्जर देत आहे. प्रोटेक्शनसाठी, पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी फोन IP52 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile