Redmi 14C 5G ची आज भारतात पहिली Sale सुरु, कमी किमतीत Powerful फीचर्ससह नवा स्मार्टफोन

Updated on 10-Jan-2025
HIGHLIGHTS

Redmi ने Redmi 14C 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात जानेवारीच्या सुरुवातीला लाँच केला.

आज म्हणजेच 10 जानेवारी 2025 पासून Redmi 14C 5G ची विक्री सुरू झाली आहे.

Redmi 14C 5G फोनच्या मागील बाजूस 50MP AI ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने Redmi 14C 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात जानेवारीच्या सुरुवातीला म्हणजेच अलीकडेच लाँच केला आहे. दरम्यान, नव्या स्मार्टफोनची विक्री आज म्हणजेच 10 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. लक्षात घ्या की, पहिल्या सेलमध्ये हा फोन मोठ्या सवलतीसह खरेदी करता येणार आहे. या फोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स साईट Amazon India द्वारे केली जाईल. जाणून घेऊयात Redmi 14C 5G ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Best Gaming Smartphones Under 20000: 2025 मध्ये खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम फोन्स, सवलतीसह उपलब्ध

Redmi 14C 5G ची किंमत आणि ऑफर्स

नवीनतम Redmi 14C 5G फोनच्या 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांना आणि टॉप
6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. या सर्व किमतीत स्मार्टफोन्स लाँच ऑफरअंतर्गत खरेदी करता येणार आहेत. हा स्मार्टफोन स्टारगेझ ब्लॅक, स्टारडस्ट पर्पल आणि स्टारलाईट ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Redmi 14C 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नवीनतम Redmi 14C 5G स्मार्टफोनमध्ये 6.88 इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Redmi च्या या नवीन हँडसेटमध्ये 4nm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, हा फोन Xiaomi Hyper OS वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनमध्ये, यात 6GB रॅम 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक इ. फीचर्स आहे.

Redmi-14C-5G Specs

फोटोग्राफीसाठी, Redmi 14C 5G फोनच्या मागील बाजूस 50MP AI ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5160mAh बॅटरी आहे. हे 18W चार्जिंग सपोर्टसह येते. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. एवढेच नाही तर, कंपनी या फोनसोबत 33W चा चार्जर देखील देणार आहे. विशेष म्हणजे पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी फोन IP52 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :