प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चा Realme P2 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या फोनच्या लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. हा स्मार्टफोन कर्व डिस्प्लेसह येणारा सर्वात वेगवान स्मार्टफोन आहे, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये व्हीसी कुलिंग सिस्टीम देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन लवकर गरम होणार नाही. जाणून घ्या किमत आणि सर्व तपशील-
Also Read: OpenAI o1: नवीनतम AI मॉडेल लाँच! ChatGPT पेक्षा कमी दरात उपलब्ध, ‘अशा’प्रकारे करेल काम
लेटेस्ट Realme P2 Pro स्मार्टफोन 8GB+128, 12GB+256 आणि 12GB+512GB स्टोरेज अशा तीन स्टोरेज ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत 21,999 रुपये, 24999 रुपये आणि 27,999 रुपये इतकी आहे. मात्र, लक्षात घ्या की, दिवाळीपूर्वी हे तिन्ही व्हेरिएंट अनुक्रमे 19,999 रुपये, 21,999 रुपये आणि 24,999 रुपयांना खरेदी करता येतील. प्रसिद्ध शॉपिंग साईट Flipkart वर 17 सप्टेंबरपासून फोनची अर्ली बर्ड सेल सुरू होईल.
Realme P2 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz इतका आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी, डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन ग्लास बसवण्यात आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन अप्रतिम रेन वॉटर स्मार्ट टच सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. जेणेकरून, पावसातही तुम्हाला हा फोन वापरता येईल. हा फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल.
सुरळीत कामकाजासाठी, स्मार्टफोन ब्रँड Realme ने P2 Pro 5G मध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. उत्तम फोटोग्राफीसाठी, Realme P2 Pro मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP आणि 8MP लेन्सचा समावेश आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी क्लिक करण्यासाठी 32MP कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5200mAh बॅटरी मिळेल, जी 80W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात Wi-Fi, ड्युअल सिम स्लॉट, GPS आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.