लेटेस्ट Realme P2 Pro 5G ची आज भारतात दोन तासांची Special सेल, मिळतील अगदी जबरदस्त ऑफर्स
नवीनतम स्मार्टफोन Realme P2 Pro 5G फोन अलीकडेच भारतात लाँच
Realme P2 Pro 5G फोनची अर्ली बर्ड सेल भारतात आज संध्याकाळी
Realme P2 Pro 5G फोनवर तुम्हाला 1000 रुपयांची बँक सवलत मिळेल.
Realme ने अलीकडेच भारतात आपला नवीनतम स्मार्टफोन Realme P2 Pro 5G फोन लाँच केला होता. त्यानंतर, आज या फोनची अर्ली बर्ड सेल आहे. ही सेल प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर आज संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. हे सेल केवळ दोन तासांसाठी असणार आहे, म्हणेजच या सेलचा लाभ तुम्ही आज संध्याकाळी केवळ 6 ते 8 वाजतापर्यंत घेऊ शकता. या सेलदरम्यान या स्मार्टफोनवर उत्तम ऑफर्स उपलब्ध असतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता Realme P2 Pro 5G वरील सर्व ऑफर्स आणि तपशील जाणून घ्या.
Realme P2 Pro 5G ची किंमत
Realme P2 Pro 5G हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. यामध्ये 8GB + 128, 12GB + 256 आणि 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत. त्यानुसार, या फोनच्या किमती अनुक्रमे 21,999 रुपये, 24999 रुपये आणि 27,999 रुपये आहेत. मात्र, लक्षात घ्या की, दिवाळीपूर्वी हे तिन्ही मॉडेल्स 19,999 रुपये, 21,999 रुपये आणि 24,999 रुपयांना खरेदी करता येतील.
Get ready to experience the fastest and most immersive curved display with the #realmeP2Pro5G. A phone that delivers speed with style, starting at ₹19,999*.
— realme (@realmeIndia) September 13, 2024
Early Bird Sale on 17th Sept, 6-8 PM.
Know more: https://t.co/XUTB90pZZS #FastestCurvedDisplayPhone pic.twitter.com/TDLTOHkixt
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर तुम्हाला 1000 रुपयांची बँक सवलत मिळणार आहे. तर, तुम्हाला Realme च्या या मोबाइल फोनवर स्वस्त EMI आणि मजबूत एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे.
Realme P2 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme P2 Pro 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, Realme ने या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर दिला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी, Realme च्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. या सेटअपमध्ये 50MP मुख्य सेन्सर मिळणार आहे. तर, 8MP सेकंडरी लेन्स मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5200mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट सारखी फीचर्स मिळणार आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile