Realme P1 Speed 5G नवीनतम फीचर्ससह भारतात लाँच, जाणून घ्या किमत आणि सर्व Powerful फीचर्स
Realme चा नवा स्मार्टफोन Realme P1 Speed 5G भारतात लाँच
Realme फोनची विक्री 20 ऑक्टोबरपासून Flipkart वर सुरु होणार आहे.
Realme ने नव्या Realme P1 Speed 5G फोनमध्ये VC कुलिंग प्रदान केले आहे.
मागील काही दिवसांपासून Realme च्या नव्या Realme P1 Speed 5G फोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. अखेर आता कंपनीने Realme P1 Speed 5G चे भारतात लाँच केले आहे. या स्मार्टफोनमध्ये 26GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. तर, फोटोग्राफीसाठी या हँडसेटमध्ये 50MP AI कॅमेरा आहे. हे फोन भारतात Xiaomi, Vivo आणि Oppo सारख्या स्मार्टफोन ब्रँडच्या उपकरणांशी जबरदस्त स्पर्धा करेल. जाणून घेऊयात Realme P1 Speed 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: Google Pixel 9 Pro फोन लवकरच भारतात होणार दाखल! जाणून घ्या कुठे होणार सेल आणि सर्व डिटेल्स
Realme P1 Speed 5G ची किंमत
Need a phone that handles intense Gaming and Multitasking?#realmeP1Speed5G with MediaTek Dimensity 7300E and 6050mm² Stainless Steel VC Cooling is here to deliver.
— realme (@realmeIndia) October 15, 2024
Starting from ₹15,999*
Know more: https://t.co/3llJA3HQ4shttps://t.co/BbgT12xPUP #LegendOfChipsets
Realme P1 Speed 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्याबरोबरच, या फोनच्या 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किमत 20,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 20 ऑक्टोबरपासून ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर सुरु होणार आहे.
Realme P1 Speed 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme P1 Speed 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनची स्क्रीन 90 FPS ला सपोर्ट करते. याशिवाय, उत्तम परफॉर्मन्ससाठी या हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB RAM, 14GB व्हर्चुअल रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. Realme ने नव्या फोनमध्ये VC कुलिंग प्रदान केले आहे.
Realme च्या नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिली 50MP AI लेन्स, दुसरी 2MP सेकंडरी आणि तिसरी लेन्स आहे. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4, ड्युअल सिम स्लॉट, GPS, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे. उत्तम आवाजासाठी फोनमध्ये ड्युअल स्पीकर उपलब्ध आहेत. तसेच, फोनला IP65 रेटिंग मिळाले आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile