Realme ने अलीकडेच भारतात Realme P1 सिरीज सादर केली आहे. सिरीजमध्ये Realme P1 5G आणि Realme P1 Pro 5G स्मार्टफोन समाविष्ट आहेत. दरम्यान, आता ब्रँडने Realme P1 5G चे नवीन 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले आहे. Realme P1 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आणि 50MP प्रायमरी कॅमेरा इ. मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात, Realme P1 5G च्या नव्या व्हेरिएंटची किंमत-
Realme P1 5G हा फोन आधी 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GBRAM + 256GB स्टोरेज या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध होता. फोनच्या नव्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. उपलद्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन आता Flipkart आणि Realme eStore वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Realme सध्या फोनवर 500 रुपयांची सवलत देत आहे. त्याबरोबरच, कूपन कोड वापरून 1,000 रुपयांची सूट देखील मिळेल. हे कूपन फक्त Realme eStore वर लागू आहे.
Realme P1 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आहे. हा फोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 सह कार्य करतो. त्याबरोबरच, फोनमध्ये दोन अँड्रॉइड अपडेट्स मिळतील, असा कंपनीचा दावा आहे. फोनचा पॅनेल रेनवॉटर टच फीचरच्या सपोर्टसह आहे, जो ओले हात किंवा पावसातही फोन वापरता येईल.
फोटोग्राफीसाठी, Realme P1 5G मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा आहे. समोर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP चा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 45W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. हे धूळ आणि स्प्लॅश संरक्षणासाठी IP54 रेटिंगसह देखील येते.