PRICE CUT! लेटेस्ट Realme GT 7 Pro च्या किमतीत मोठी कपात, डील मर्यादित काळासाठी उपलब्ध 

PRICE CUT! लेटेस्ट Realme GT 7 Pro च्या किमतीत मोठी कपात, डील मर्यादित काळासाठी उपलब्ध 
HIGHLIGHTS

Realme GT 7 Pro स्मार्टफोन कंपनीचा प्रिमियम स्मार्टफोन आहे.

Realme GT 7 Pro फोनवर 6000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Realme GT 7 Pro फोनवरील प्राईस कट केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे.

Realme GT 7 Pro स्मार्टफोन काही काळापूर्वी भारतात लाँच केले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे, जो अनेक पॉवरफुल फीचर्ससह सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन कंपनीने दोन महिन्याआधी लाँच केला होता. अवघ्या दोन महिन्यात या स्मार्टफोनची किंमत हजारो रुपयांनी कमी केली आहे. कंपनीच्या 12GB रॅम 256GB स्टोरेज व्हेरिएंटच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. लक्षात घ्या की, ही प्राईस कट केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. जाणून घेऊयात Realme GT 7 Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Nothing चा आगामी स्मार्टफोन लवकरच भारतात होणार दाखल! लाँच डेट कन्फर्म, पहा टीझर Video

Realme GT 7 Pro 5G get huge discount

Realme GT 7 Pro च्या किमतीत कपात

कंपनीने भारतात दोन मॉडेल्समध्ये Realme GT 7 Pro फोन सादर केला आहे. लाँचच्या वेळी, या फोनच्या 12GB रॅम 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये होती. त्याबरोबरच, 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 65,999 रुपये होती. आता कंपनीच्या साइटवर या स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. आपण आता 54,999 रुपयांमध्ये 12GB रॅम व्हेरिएंट खरेदी करू शकता.

तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 59,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. नव्या किमतीसाठी तुम्हाला अधिकृत साईटला भेट द्यावी लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या Realme Days सेल सुरु आहे. या फोनवर 6000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा सेल 31 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहील.

Realme GT 7 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme GT 7 Pro फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रीफ्रेश दर 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या व्यतिरिक्त, फोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळणार आहे. तसेच, पाण्याच्या प्रतिकारासाठी फोनमध्ये IP69 रेटिंग देण्यात आले आहे. तसेच, हा फोन Android 15 वर कार्य करतो.

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी हा कॅमेरा बेस्ट आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी मूलभूत कार्यांसह दोन दिवसांपर्यंत चालेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo