Realme GT 7 Pro 5G: आता बिंदास करा अंडरवॉटर फोटोग्राफी! जबरदस्त स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, पहा किंमत
Realme ने अखेर Realme GT 7 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला.
Realme GT 7 Pro 5G फोन नवीनतम Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येणार भारतातील पहिला स्मार्टफोन आहे.
नव्या फोनची विक्री 29 नोव्हेंबरपासून Amazon India वर सुरू होईल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अखेर Realme GT 7 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा भारतीय बाजारामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रथम चीनच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये हा फोन सादर करण्यात आला. त्यानंतर, आता हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात देखील लाँच झाला आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, Realme GT 7 Pro 5G फोन नवीनतम Qualcomm च्या Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येणार भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. हा फोन Vivo, Oppo आणि Samsung सारख्या कंपन्यांना जबरदस्त स्पर्धा देईल.
Also Read: PAN 2.0 Project: QR कोड असलेल्या पॅन कार्डला सरकारने दिली मान्यता, करदात्यांना मिळतील अनेक लाभ
Realme GT 7 Pro 5G ची भारतीय किंमत
Introducing #realmeGT7Pro, powered by #GT7ProFirst8EliteFlagship. Experience lightning-fast performance, ultra-smooth gaming, and seamless multitasking—all starting at ₹56,999*.
— realme (@realmeIndia) November 26, 2024
Know more: https://t.co/8ZlhNQA5fY https://t.co/9lTyrFB3HH
#DarkHorseOfAI
Realme GT 7 Pro फोन 12GB+ 256GB स्टोरेज आणि 16GB+ 512GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत अनुक्रमे 56,999 आणि 62,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही मॉडेल्सच्या किमतीत 3000 रुपयांची सूट मिळेल. याव्यतिरिक्त, उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 29 नोव्हेंबरपासून Amazon India वर सुरू होईल.
Realme GT 7 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा LTPO OLED कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. यात HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये वर सांगितल्याप्रमाणे Qualcomm चा नवीनतम Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, यात 16GB RAM, 512GB इंटरनल स्टोरेज, 120 FPS MOBA गेमिंग, VC कुलिंग आणि चांगल्या गेमिंगसाठी Realme GT Moto 2.0 आहे.
Realme च्या नवीन स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी सेन्सर, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, हँडसेटच्या समोर 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5800mAh बॅटरी दिली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगचा सपोर्टसह येते.
वॉटरप्रूफसाठी या फोनला IP69 रेटिंग मिळाले आहे. अर्थात पाण्यात भिजल्यावर देखील फोन खराब होणार नाही. विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो की, याद्वारे पाण्याखालीही उत्तम फोटोज क्लिक करता येतील. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ड्युअल सिम स्लॉट, 5G, 4G VoLTE, GPS, WiFi, ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट सारखी कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये आहेत. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन देखील आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile