अलीकडेच कंपनीने Realme GT 6T स्मार्टफोन लाँच केला आहे.
Realme GT 6T फोनची अर्ली ऍक्सेस सेल आज म्हणजेच 28 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरु
Realme GT 6T सेल केवळ मर्यादित काळासाठी लाईव्ह आहे.
नुकतेच प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme GT 6T स्मार्टफोन लाँच केला आहे. केवळ स्मार्टफोनचं नाही तर, यासोबत कंपनीने Realme Buds Air 6 देखील लाँच केले आहेत. त्यानंतर, आज या दोन्ही डिवाइसची अर्ली ऍक्सेस सेल लाईव्ह झाली आहे. हे सेल केवळ मर्यादित काळासाठी लाईव्ह असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme GT 6T फोनची किंमत आणि ऑफर्स-
लेटेस्ट Realme GT 6T फोनची अर्ली ऍक्सेस सेल आज म्हणजेच 28 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरु झाली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, ही सेल केवळ मर्यादित काळासाठी लाईव्ह आहे. ही सेल दुपारी 12 वाजल्यापासून तर फक्त 2 वाजेपर्यंत लाईव्ह असणार आहे. लक्षात घ्या की, फोनची अधिकृत विक्री 29 मे रोजी दुपारी 12 वाजता amazon.in, realme.com आणि ऑफलाइन स्टोअरवर होणार आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या सेलदरम्यान बँक ऑफर अंतर्गत तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, तुम्हाला सुमारे 2000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट EMI पर्याय देखील मिळेल.
Realme GT 6T चे स्पेसिफिकेशन्स
Realme GT 6T फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रीफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. उत्तम कार्यक्षमतेसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये OIS सह 50MP मुख्य कॅमेरा, 8MP Sony IMX355 वाइड-एंगल लेन्स मिळणार आहे. तर, फ्रंट कॅमेरा 32MP Sony IMX615 सेन्सर आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 120W जलद चार्जिंगसह 5500mAh बॅटरी मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.