Realme 14x Launched: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme च्या नव्या Realme 14x स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. कंपनीने अधिकृतपणे भारतात पहिला Realme 14 सीरीज स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Realme 12x चा सक्सेसर म्हणून सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधकतेसाठी IP69 रेटिंगसह पाठवलेला हा हँडसेट सेगमेंटमधील पहिला फोन आहे. जाणून घेऊयात Realme 14x ची किंमत आणि संपूर्ण तपशील-
Also Read: 2024 मध्ये Powerful फीचर्ससह भारतात लाँच झालेले टॉप 5 फ्लॅगशिप Smartphones, पहा संपूर्ण यादी
Realme च्या नव्या Realme 14x ची किंमत बेस 6GB+128GB मॉडेलसाठी 14,999 रुपयांपासून सुरू होते. तर, फोनच्या 8GB+ 1218GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हँडसेट आता Flipkart आणि Realme वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी या फोनवर 1000 रुपयांची झटपट बँक सूट देत आहे. हा फोन क्रिस्टल ब्लॅक, गोल्डन ग्लो आणि ज्वेल रेड कलर ऑप्शन्ससह खरेदी केला जाऊ शकतो. येथून खरेदी करा
Realme 14x मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC प्रोसेसर मिळेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 10GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील आहे. या फोनमध्ये 6GB + 128GB आणि 8GB + 128GB अंतर्गत स्टोरेज आहे, जी मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल.
याव्यतिरिक्त, Realme 14x मध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फॉमध्ये 8MP चा फ्रंट शूटर देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा हँडसेट 45W जलद चार्जिंगसह मोठी 6,000mAh बॅटरी पॅक करतो.
Realme 14x स्मार्टफोनमध्ये रेनवॉटर स्मार्ट टच, 200% अल्ट्रा व्हॉल्यूम मोड, शारीरिक स्पर्श न करता फोन नियंत्रित करण्यासाठी एअर जेश्चर फिचर उपलब्ध आहे. तसेच, पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनमध्ये IP69 रेटिंग देण्यात आले आहे. तर, टिकाऊपणासाठी या स्मार्टफोनला आर्मरशेल संरक्षण देखील देण्यात आले आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.