Realme 14 Pro सिरीज अखेर भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स

Updated on 16-Jan-2025
HIGHLIGHTS

Realme ने Realme 14 Pro सीरीज आज अखेर भारतीय बाजारात लाँच केली.

सीरीजअंतर्गत कंपनीने Realme 14 Pro 5G आणि Realme 14 Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन सादर केले.

Realme 14 Pro सीरीजचे प्री-बुकिंग देखील सुरु झाले, पहा किंमत आणि ऑफर्स

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme 14 Pro सीरीज आज अखेर भारतीय बाजारात लाँच केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने Realme 14 Pro 5G आणि Realme 14 Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. फोन अनेक रंग आणि रॅम व्हेरिएंट आणले गेले आहेत. स्मार्टफोनसोबत कंपनीने Realme wireless buds 5 ANC देखील लाँच केला आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 दरम्यान स्मार्टवॉच Best डील्स उपलब्ध! जाणून घ्या ऑफर्स

Realme 14 Pro सिरीजची किंमत

सर्वप्रथम, Realme 14 Pro 5G च्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 24,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, या फोनचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किमत 26,999 रुपये इतकी आहे. या फोनची सेल 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावर 2000 रुपयांची बँक सूट मिळेल.

दुसरीकडे, Realme 14 Pro+ 5G हा फोन तीन व्हेरिएंटसह लाँच केले गेला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळेल, ज्याची किंमत 29,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, दुसरा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 31,999 रुपयांना आणि फोनचा 12B रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणार टॉप व्हेरिएंट 34,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही स्मार्टफोन अधिकृत वेबसाइट Flipkart वर व्रिकीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. दोन्ही फोन Suede Grey, Pearl White आणि जयपूर पिंक कलर ऑप्शन्ससह येतात. या फोनचे प्री-बुकिंग आज दुपारी 1.15 वाजल्यापासून सुरू होईल. 22 जानेवारीपर्यंत प्री-बुकिंग करून तुम्ही अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

Realme 14 Pro 5G

Realme 14 Pro

Realme 14 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Dimensity 7300 Energy 5G चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. तर, स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोन 6000mAh मोठ्या बॅटरीसह येतो. विशेष म्हणजे या सिरीजमधील स्मार्टफोन तापमानांनुसार रंग बदलण्याऱ्या बॅक पॅनलसह येतात.

Realme 14 Pro+ 5G

Realme 14 Pro स्मार्टफोनमध्ये 6.83 इंच क्वाड कर्व OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Realme UI 6.0 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज आहे. तसेच, प्रोटेक्शनसाठी हा डिव्हाइस कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i च्या संरक्षणासह येतो.

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मुख्य Sony IMX896 सेन्सर, 50MP Sony IMX882 पेरिस्कोप लेन्स आणि 8MP Sony IMX896 अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि फोटोग्राफीसाठी फोनच्या फ्रंटला 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. Realme चा हा फोन 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :