आगामी Poco X7 सिरीजची भारतीय लाँच डेट Confirm! 32MP फ्रंट कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स 

आगामी Poco X7 सिरीजची भारतीय लाँच डेट Confirm! 32MP फ्रंट कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स 
HIGHLIGHTS

आगामी POCO X7 सिरीजच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी

कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे POCO X7 सिरीजच्या भारतीय लाँच तारखेची पुष्टी

या सिरीजसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील Flipkart वर लाइव्ह झाली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco च्या आगामी स्मार्टफोन लाँचची चर्चा सुरु झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, POCO X7 सिरीजच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी करण्यात आली आहे. या सिरीज अंतगर्त POCO X7 आणि POCO X7 Pro असे दोन स्मार्टफोन समाविष्ट असतील. एवढेच नाही तर, या सिरीजसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील Flipkart वर लाइव्ह झाली आहे. याद्वारे आगामी स्मार्टफोन्सबद्दल अनेक तपशील उघड झाले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर-

Also Read: Holiday Phone Fest: वर्षातील शेवटच्या सेलमध्ये महागडे स्मार्टफोन्स मोठ्या Discount सह खरेदीची संधी, पहा यादी

Poco X7 सिरीजची भारतीय लाँच डेट

वर सांगितल्याप्रमाणे, Poco ने आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. होय, POCO India ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे POCO X7 सिरीजच्या भारतीय लाँच तारखेची पुष्टी केली आहे. ही सिरीज भारतात 9 जानेवारी रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होईल. याशिवाय, या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरु होणार आहे.

वर सांगितल्याप्रमाणे, फोनची मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. या साईटच्या माध्यमातून फोनचा फर्स्ट लुकही समोर आला आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल पॅटर्न डिझाइन देखील दिसले आहे. ज्यामध्ये येलो आणि ब्लॅक डिझाइन देखील असेल.

Poco X7 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

पुढे आलेल्या लीक्सनुसार, Poco X7 आणि Pro मॉडेल 6.67 इंच लांबीच्या OLED डिस्प्लेसह येईल, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz इतकी असेल. या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन मिळू शकते. उत्तम परफॉर्मन्ससाठी, X7 फोन MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसरने सुसज्ज असेल. तर, प्रो मॉडेल MediaTek Dimensity 8400 Ultra प्रोसेसरने सुसज्ज असू शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश असेल.

poco x7 series india launch

तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, Poco X7 फोन 5110mAh बॅटरीने सुसज्ज असेल, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. तर, Pro फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. मात्र, फोनचे योग्य स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo