लेटेस्ट POCO X7 सिरीजची भारतात पहिली सेल आज, जाणून किंमत आणि Best ऑफर्स

Updated on 14-Jan-2025
HIGHLIGHTS

POCO ने POCO X7 सिरीज मागील आठवड्यात भारतात लाँच केली आहे.

नवे फोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे विक्रीसाठी उपलब्ध होतील.

पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता POCO ने POCO X7 सिरीज मागील आठवड्यात भारतात लाँच केली आहे. त्यानंतर, आज POCO X7 सिरीजची पहिली सेल भारतात सुरु होणार आहे. या सिरीजअंतर्गत Poco X7 5G आणि Poco X7 Pro असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. नवे फोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे विक्रीसाठी उपलब्ध होतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या फ्लिपकार्ट मोन्युमेंटल सेल सुरू आहे.

या सेलमध्ये नवीनतम स्मार्टफोन्सवर आणखी कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध होतील. POCO X7 Pro 5G ची पहिली विक्री आज म्हणजेच 14 जानेवारी 2025 रोजी Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होईल. पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. जाणून घेऊयात फोनवरील उपलब्ध असलेल्या पहिल्या सेल ऑफर्सचे तपशील-

Also Read: नवीनतम Moto G05 सेल अखेर भारतीय बाजारात सुरू! किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी, पहा Best ऑफर्स

Poco X7

POCO X7 सिरीजची किंमत आणि ऑफर्स

POCO X7 चा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्याबरोबरच, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह या फोनचा टॉप व्हेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये तुम्हाला कोणत्याही बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची सूट मिळेल. Buy From Here

याव्यतिरिक्त, POCO X7 Pro फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणाऱ्या बेस व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. तसेच, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणाऱ्या टॉप व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर देखील 2000 रुपयांची सवलत मिळेल. Buy From Here

POCO X7

POCO X7 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा कर्व AMOLED 3D डिस्प्ले आहे. जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शनसह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP Sony LYT600 प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP तिसरा सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 20MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

POCO X7 Pro

POCO X7 5G Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.73-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 8400 Ultra प्रोसेसरने सुसज्ज आहे. विशेष म्हणजे वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये IP66, IP68, IP69 रेटिंग देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP Sony LYT600 प्राथमिक कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तर, हा फोन 20MP फ्रंट कॅमेरासह सुसज्ज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6550mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :