आज Poco ने देखील POCO X7 सिरीज स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या सिरीजअंतर्गत Poco X7 5G आणि POCO X7 Pro हे फोन्स लाँच करण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतात लाँचिंगसोबतच POCO X7 मालिकेचे जागतिक स्तरावर पदार्पण देखील झाले आहे. तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन मिड-रेंज स्मार्टफोन्स POCO X6 आणि X6 Pro च्या अपग्रेडेड व्हर्जन म्हणून आणले गेले आहेत. जाणून घेऊयात नव्या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: अखेर Oppo Reno 13 सिरीज भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स
लेटेस्ट Poco X7 5G चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर, त्याचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 21,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन कंपनीने यलो, ग्रीन आणि सिल्व्हर रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 14 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. दोन्ही फोन ई-कॉमर्स साइट Flipkart द्वारे विक्रीसाठी उपलब्ध असतील.
तर, दुसरीकडे Poco X7 Pro 5G चा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 24,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर, त्याचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 26,999 रुपयांना खरेदी करता येईल. ही एक खास लाँच किंमत आहे. यामध्ये बँक डिस्काउंट आणि कूपन डिस्काउंटचा समावेश आहे. Poco X7 Pro 5G हा फोन पोको येलो, नेब्युला ग्रीन आणि ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.
Poco X7 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा 1.5K AMOLED 3D कर्व डिस्प्ले आहे, जो त्याच्या सेगमेंटमधील सर्वात टिकाऊ कर्व डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरला देखील सपोर्ट करते. त्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण देण्यात आले आहे. तर, प्रो मॉडेलमध्ये 6.73-इंच लांबीचा मोठा 1.5K AMOLED फ्लॅट डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i ने संरक्षित आहे.
उत्तम परफॉर्मन्ससाठी POCO X7 मध्ये कामगिरीसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 73000 अल्ट्रा चिपसेट आहे. तर, प्रो व्हेरिएंटमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8400 अल्ट्रा प्रोसेसर देखील उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी या हँडसेटमध्ये 50MP चा सोनी LYT-600 प्रायमरी OIS कॅमेरा आहे, जो 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरासोबत येतो. समोर, सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तर, प्रो व्हेरिएंटमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP सोनी LYT-600 OIS प्रायमरी सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील समाविष्ट आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
POCO X7 मध्ये 45W टर्बो चार्जसह 5500mAh की बॅटरी मिळेल. याशिवाय, हा फोन IP66, IP68 आणि IP69 रेटेड आहे. दुसरकडे, प्रो व्हेरिएंटमध्ये पॉवर बॅकअपसाठी, यात 6550mAh ची मोठी बॅटरी आहे. ते चार्ज करण्यासाठी, 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.