Poco M7 Pro Sale: लेटेस्ट मिड-रेंज स्मार्टफोनची पहिली सेल भारतात सुरु, 50MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स

Updated on 20-Dec-2024
HIGHLIGHTS

Poco ने Poco M7 Pro 5G या अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला.

Poco M7 Pro 5G ची पहिली विक्री भारतात Flipkart वर सुरु

HDFC बँक, ICICI बँक आणि SBI कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1,000 ची त्वरित सूट

Poco M7 Pro Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco ने Poco M7 Pro 5G या अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला आहे. त्यानंतर, आज प्रथमच हा फोन भारतात विक्रीसाठी सज्ज झाला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Poco M7 Pro या आठवड्याच्या सुरुवातीला भारतात Poco C75 5G सोबत सादर केला गेला होता. Poco ने Poco M7 Pro फोन मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. हा स्मार्टफोन इ-कॉमर्स साईट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. जाणून घेऊयात Poco M7 Pro ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-

Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या OPPO Find X8 5G फोनवर तब्बल 7000 रुपयांपर्यंत Discount, पहा Best ऑफर

poco M7 Pro 5G

Poco M7 Pro ची पहिली सेल

वर सांगितल्याप्रमाणे, Poco M7 Pro 5G ची विक्री आज दुपारी 12 वाजता Flipkart द्वारे भारतात सुरू झाली आहे. लक्षात घ्या की, Poco M7 Pro 5G ची किंमत 6GB+128GB मॉडेलसाठी 14,999 रुपयांपासून सुरू होते. तर, 8GB+ 256GB व्हेरिएंट तुम्हाला 16,999 रुपयांना मिळणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक, ICICI बँक आणि SBI कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1,000 ची त्वरित सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Poco M7 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लेटेस्ट Poco M7 Pro 5G यात 6.67-इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह येतो. फोनच्या सुरक्षिततेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7025 Ultra चिपसेटद्वारे समर्थित आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह जोडलेले आहे. फोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP64 रेटिंग देण्यात आली आहे.

POCO M7 Pro 5G

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Poco M7 Pro 5G मध्ये OIS सह 50MP Sony LYT-600 प्राथमिक कॅमेरा आणि 2MP सेकंडरी सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Dolby Atmos सह ड्युअल स्टिरीओ स्पीकर्सद्वारे ऑडिओ मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 5110mAh बॅटरी मिळणार आहे. हा फोन लुनर डस्ट, लॅव्हेंडर फ्रॉस्ट आणि ऑलिव्ह ट्वायलाइट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :