Poco C75 5G Vs Moto G35 5G: आपणा सर्वांना माहितीच आहे की, Poco आणि Motorola या दोन्ही प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी नुकतेच आपले नवीन बजेट स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत. Poco ने नुकतेच Poco C75 5G आणि Motorola ने Moto G35 फोन भारतात लाँच केला आहे. या दोन्ही फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. मार्केटमध्ये हे दोन्ही फोन्स एकमेकांना टक्कर देत आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी दोन्ही फोन्सची तुलना केली आहे.
Poco C75 5G ची किंमत 7,999 रुपये आहे. कंपनीने आजच या स्मार्टफोनची विक्री भारतात सुरू केली आहे. तर, Motorola च्या नवीन Moto G35 5G स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Moto G35 5G फोन 6.72 इंच लांबीच्या IPS LCD FHD+ डिस्प्लेसह येतो. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे, तर रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, दुसरीकडे, Poco फोनमध्ये 6.88 इंच लांबीचा IPS LCD HD+ डिस्प्ले आणि 120Hz चा रिफ्रेश रेट आहे.
Poco फोन Qualcomm Snapdragon 4s Gen2 चिपसेटच्या पॉवरसह येतो. यात 2.0GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि Adreno GPU असेल. तर, Moto G35 5G फोन चांगल्या परफॉर्मन्ससाठी, Unisoc T760 चिपसेटद्वारे समर्थित आहे, ज्यामध्ये 2.2GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि Mali-G57 GPU आहे.
दोन्ही फोनमध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा आहे. लक्षात घ्या की, Poco C75 मध्ये एकच 50MP कॅमेरा आहे, तर Moto G35 मध्ये 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तर, Poco C75 च्या 5MP कॅमेराच्या तुलनेत, Moto G35 मध्ये 16MP सेल्फी कॅमेरा ऑफर केला आहे.
Moto G35 5G मध्ये 18W जलद चार्जिंगसह 5,000mAh बॅटरीसह येतो. तर, Poco C75 5G मध्ये थोडी मोठी 5,160mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, उत्तम कॅमेरा कार्यप्रदर्शन, डिस्प्ले रिझोल्यूशन आणि हलके वजन यासाठी, तुम्ही Motorola Moto G35 5G निवडू शकता. तर, Poco C75 5G कमी किंमत आणि मोठ्या बॅटरीसाठी उत्तम आहे. अखेर तुम्ही तुमच्या गरजेनुसार यापैकी कोणता फोन तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो, हे तपासून फोन खरेदी करावा.