अखेर Oppo Reno 13 सिरीज भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स 

अखेर Oppo Reno 13 सिरीज भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स 
HIGHLIGHTS

Oppo ने अखेर आपली नवीन स्मार्टफोन सिरीज Oppo Reno 13 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली.

सिरीजअंतर्गत Oppo Reno 13 5G आणि Oppo Reno 13 Pro 5G स्मार्टफोन लाँच

Oppo Reno 13 फोनमध्ये AI लाईव्ह फोटो सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने अखेर आपली नवीन स्मार्टफोन सिरीज Oppo Reno 13 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत Oppo Reno 13 5G आणि Oppo Reno 13 Pro 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे Oppo Reno 13 फोनमध्ये AI लाईव्ह फोटो सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. ही सिरीज कंपनीने हायर मिड बजेट रेंजमध्ये सादर केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Oppo Reno 13 सिरीजची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: नवा बजेट स्मार्टफोन Itel Zeno 10 भारतीय बाजारात लाँच, किंमत 6,000 रुपयांपेक्षा कमी

Oppo Reno 13 सिरीजची भारतीय किंमत

लेटेस्ट Oppo Reno 13 फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या फोनच्या 8GB+ 256GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे Oppo Reno 13 Pro 5G स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी आहे. त्याबरोबरच, फोनच्या 12GB+512GB व्हेरिएंटची 54,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही डिव्हाइसेसची विक्री 11 जानेवारीपासून सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना 10% कॅशबॅक आणि 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI पर्याय मिळू शकतात. तसेच, यासह कंपनी 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे.

Oppo Reno 13 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Oppo Reno 13 मध्ये 6.59 इंच लांबीचा 120Hz 1.5K स्मार्ट अ‍ॅडॉप्टिव्ह स्क्रीन मिळेल. तर, दुसरीकडे Oppo Reno 13 Pro मध्ये 6.83 इंच लांबीचा 120Hz 1.5k स्मार्ट अ‍ॅडॉप्टिव्ह स्क्रीन मिळेल.

प्रोसेसर

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Oppo Reno 13 डिव्हाइसच्या आतील बाजूस MediaTek Dimensity 8350 चिपसेट (4nm प्रक्रिया) आहे. तर, दुसरीकडे Oppo Reno 13 Pro मध्ये सुद्धा MediaTek Dimensity 8350 चिपसेट आहे.

oppo reno 13 series

कॅमेरा

Oppo Reno 13 मध्ये 50MP चा प्रायमरी शूटर, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मोनोक्रोम कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, स्मार्टफोनमध्ये 50MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. दुसरीकडे, Oppo Reno 13 Pro मध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 50MP चा टेलिफोटो सेन्सर, डिजिटल झूमसह 8MP अल्ट्रावाइड सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी, स्मार्टफोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी

Oppo Reno 13 स्मार्टफोनला 5600mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. तर, दुसरीकडे हे डिव्हाइस IP66, IP68 आणि IP69 प्रमाणित आहे. दुसरीकडे, पॉवर बॅकअपसाठी, Oppo Reno 13 Pro मध्ये 5,800 mAh ची मोठी बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन IP66, IP68 आणि IP69 प्रमाणपत्रांसह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo