Oppo K12x 5G Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री आजपासून भारतात सुरु, कमी किमतीत मिळतात Powerful फीचर्स

Updated on 02-Aug-2024
HIGHLIGHTS

लेटस्ट Oppo K12x 5G भारतीय बाजारात विक्री सुरु

Oppo K12x 5G फोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे.

Oppo K12x 5G फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर उपलब्ध आहे.

Oppo ने अलीकडेच आपला नवा स्मार्टफोन Oppo K12x 5G भारतीय बाजारात लाँच केला. या स्मार्टफोनची आज पहिली विक्री देखील भारतात सुरु झाली आहे. पहिल्या सेलमध्ये स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची ही पहिलीच संधी आहे. जुलैच्या अखेरीस लाँच झालेला Oppo चा हा 5G स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्ससह येतो. हा फोन खरेदीसाठी प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart द्वारे खरेदी करता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात पहिल्या सेलमधील Oppo K12x 5G वरील ऑफर्स-

Also Read: iQOO Z9s सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म! तुमच्या बजेटमध्ये असेल का आगामी स्मार्टफोन?

Oppo K12x 5G सेल ऑफर्स

या स्मार्टफोनची सेल आज म्हणजेच 2 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन Flipkart वरून खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलदरम्यान, या फोनवर 1000 रुपयांची सूट मिळेल. ही ऑफर फक्त HDFC बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यावर दिली जाईल. Buy from here

Oppo K12x 5G ची किंमत

Oppo K12x 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आणि दुसरा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. तर, टॉप व्हेरिएंट 15,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन ब्रीझ ब्लू आणि मिडनाईट व्हायलेट या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. Buy from here

Oppo K12x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo K12x 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रीफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी हा स्मार्टफोन IP54 रेटिंगसह येतो. हा फोन Android 14 आधारित OS वर कार्य करतो. हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतो.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 32MP मुख्य आणि 2MP सेकंडरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये नाईट आणि पोर्ट्रेट मोडसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5100mAh बॅटरी आहे, जी 45W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह येईल. त्याबरोबरच, या फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ आणि हेडफोन जॅक सारखे फीचर्सही यात आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :