लेटेस्ट Oppo Find X8 सिरीजची भारतात पहिली सेल आज! नव्या फोनवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध
आज म्हणजेच 3 डिसेंबर 2024 रोजी Oppo Find X8 सिरीजची भारतात पहिली सेल
या लाइनअपमध्ये Oppo Find X8 आणि Oppo Find X8 Pro चा समावेश आहे.
HDFC, SBI सह अनेक बँकांकडून यावर 10% सूट मिळेल.
Oppo Find X8 Series Sale: नवीनतम Oppo Find X8 सीरीज अलीकडेच भारतात लाँच करण्यात आली होती. त्यानंतर, आज म्हणजेच 3 डिसेंबर 2024 रोजी या स्मार्टफोन सीरिजची पहिली सेल आहे. ही सेल प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या लाइनअपमध्ये Oppo Find X8 आणि Oppo Find X8 Pro चा समावेश आहे. पहिल्या सेलदरम्यान या महागड्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सवलत आणि ऑफर्स मिळत आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Oppo Find X8 सिरीजमधील ऑफर्स-
Also Read: Netflix युजर्स सावधान! तुम्ही आहात स्कॅमर्सच्या निशाण्यावर? ‘अशा’ प्रकारे Scam पासून होईल बचाव
Oppo Find X8 सिरीजची किंमत आणि ऑफर्स
- Oppo Find X8 12GB + 256GB = 69,999 रुपये,
- Oppo Find X8 16GB + 512GB = 79,999 रुपये आणि
- Oppo Find X8 Pro 16GB + 512GB = 99,999 रुपये.
पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC, SBI सह अनेक बँकांकडून यावर 10% सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, जुन्या फोनची देवाणघेवाण केल्यास 6000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. याव्यतिरिक्त, या हँडसेटवर नो-कॉस्ट EMI देखील मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Oppo Find X8 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
Oppo Find X8 मध्ये 6.59 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1256 2760 पिक्सेल आहे. तर, X8 Pro फोनमध्ये 2780×1264 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78-इंच लांबीची AMOLED स्क्रीन आहे. या दोन्ही डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.
प्रोसेसर
Oppo Find X8 सिरीजमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी, MediaTek Dimensity 9400 आणि Snapdragon 8 Gen 3 चिपसेट अनुक्रमे बेस आणि टॉप मॉडेल्समध्ये प्रदान केले आहेत.
कॅमेरा
Oppo Find X8 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50MP प्राथमिक, 50MP अल्ट्रा वाइड आणि 50MP टेलिफोटो सेन्सर आहे. तर, X8 Pro मध्ये 50MP मुख्य, 3X झूमला सपोर्ट करणारा 50MP टेलिफोटो आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. याव्यतिरिक्त, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी
पॉवर बॅकअपसाठी Oppo Find X8 मध्ये 5630mAh बॅटरी आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह समर्थित आहे. तर, त्याच्या प्रो मॉडेलमध्ये 5910mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे, जी 80W सुपर फ्लॅश चार्जिंगच्या समर्थनासह येते.
इतर फीचर्स
दोन्ही फोनमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोन्समध्ये WiFi, 5G, 4G VoLTE, ड्युअल सिम स्लॉट, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स आहेत.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile