Price Cut! लेटेस्ट Oppo F27 5G फोनच्या किमतीत 2000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवी किंमत
लेटेस्ट OPPO F27 5G फोनच्या किमतीत 2,000 रुपयांची घट
Oppo F27 5G लाँचच्या अवघ्या दीड महिन्यातच फोनच्या किमतीत कपात
OPPO F27 5G फोनची नवी किंमत Oppo च्या अधिकृत साईटवर लाईव्ह आहे.
सणासुदीचा हंगाम लवकरच सुरु होणार आहे, मात्र त्याआधी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने एक मोठी भेट ऑफर केली आहे. कंपनीने अलीकडेच लाँच केलेल्या OPPO F27 5G फोनच्या किमतीत 2,000 रुपयांची घट केली आहे. लक्षात घ्या की, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने हा फोन भारतात ऑगस्ट 2024 मध्येच लाँच केला. पण, अवघ्या दीड महिन्यातच या फोनची किंमत कमी झाली आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे याची घोषणा केली नसली तरी, आम्हाला ऑफलाइन रिटेल स्टोअरद्वारे माहिती मिळाली आहे.
Oppo F27 5G ची नवी किंमत
Oppo ने Oppo F27 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजारात सादर केला आहे. फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये होती. मात्र, आता फोनच्या किमतीत 2,000 रुपयांच्या कपातीनंतर या व्हेरिएंटची नवी किंमत 20,999 रुपये इतकी झाली आहे. तर, फोनच्या 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट 24,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. कपातीनंतर हा फोन आता 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. फोनची नवी किंमत Oppo च्या अधिकृत साईटवर लाईव्ह आहे.
Oppo F27 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo F27 5G फोन कंपनीने ग्लास फिनिशमध्ये सादर केला आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या बॅक पॅनलमध्ये वॉच डायल स्टाईलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 6300 Mali G57 MP2 GPU द्वारे समर्थित आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यात एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्हाला 2TB पर्यंत मायक्रो SD कार्ड जोडता येईल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W SuperVOOC चार्जिंगसह येते. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP64 रेटिंग आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा मुख्य कॅमेरा 50MP इतका आहे. विशेषतः कंपनीने f/1.8 अपर्चरसह Omnivision OV50D प्रायमरी सेन्सर वापरला आहे. त्याबरोरबच, यात 2MP सेकंडरी कॅमेरा आहे, जो पोर्ट्रेट लेन्स आहे. हा फोन 32MP सेल्फी कॅमेरासह सज्ज आहे, जो Sony IMX615 सेन्सरने सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, AI स्टुडिओ, AI इरेजर 2.0, AI स्मार्ट इमेज मॅटिंग 2.0 सारखी काही उत्कृष्ट फीचर्स कॅमेरासह उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile