32MP सेल्फी कॅमेरासह नवा OPPO F27 5G फोन भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेक्स 

 32MP सेल्फी कॅमेरासह नवा OPPO F27 5G फोन भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेक्स 
HIGHLIGHTS

Oppo चा नवीन स्मार्टफोन OPPO F27 5G अखेर भारतात लाँच

Oppo F27 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे.

Oppo F27 5G फोनची विक्री Flipkart, Amazon आणि OPPO India वर LIVE झाली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo चा नवीन स्मार्टफोन OPPO F27 5G अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे कंपनीचे नवे फ्लॅगशिप मॉडेल आहे, जे OPPO F27 सीरीज अंतर्गत सादर केले गेले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, अलिडकेच कंपनीने भारतात OPPO F27 Pro+ फोन लाँच केला होता. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OPPO F27 5G फोनची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: लेटेस्ट Realme C63 5G स्मार्टफोनची आज पहिली Sale, स्वस्त 5G फोनवर मिळतेय बंपर सूट

OPPO F27 5G ची भारतीय किंमत

Oppo कंपनीने Oppo F27 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. तर, 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री Flipkart, Amazon आणि OPPO India वर LIVE झाली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2,500 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

OPPO F27 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नवीनतम OPPO F27 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. याशिवाय, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा एक शक्तिशाली मध्यम-श्रेणी चिपसेट आहे, ज्यामध्ये ऑक्टा-कोर CPU आणि प्रगत 6nm प्रक्रिया तंत्रज्ञान आहे. यात दैनंदिन कार्ये, स्मूथ मल्टीटास्किंग आणि मध्यम गेमिंगसाठी कार्यक्षम कार्यप्रदर्शन मिळेल. हा फोन Android 14 आधारित ColorOS 14 वर काम करतो.

oppo f27 5g launched in india

स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP OV50D प्राथमिक कॅमेरा आहे. त्याबरोबरच, 2MP सेकंडरी कॅमेरा मिळणार आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo