OnePlus 13R Sale Offers: लेटेस्ट स्मार्टफोनची भारतात पहिली सेल सुरु, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी
OnePlus ने मागील आठवड्यात आपली लेटेस्ट स्मार्टफोन सिरीज OnePlus 13 लाँच केली.
OnePlus 13R ची पहिली सेल आजपासुन भारतात सुरु झाली आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
OnePlus 13R Sale Offers: फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध OnePlus ने मागील आठवड्यात आपली लेटेस्ट स्मार्टफोन सिरीज OnePlus 13 लाँच केली. सिरीज अंतर्गत OnePlus 13 आणि OnePlus 13R असे दोन फोन सादर केले गेले. त्यापैकी एक म्हणजेच OnePlus 13R ची पहिली सेल आजपासुन भारतात सुरु झाली आहे. हा नवीनतम स्मार्टफोन सवलतीसह खरेदी करण्याची ही अगदी योग्य वेळ आहे. जाणून घेऊयात OnePlus 13R ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
OnePlus 13R ची किंमत आणि ऑफर्स
OnePlus कंपनीने OnePlus 13R फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 42,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 46,999 रुपये इतकी आहे. OnePlus 13R फोनची विक्री भारतात आज 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे.
लक्षात घ्या की, हा फोन तुम्ही OnePlus India आणि Amazon India द्वारे खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, ICICI बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची झटपट सूट मिळेल. हा फोन Astral Trail आणि Nebula Noir या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
OnePlus 13R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नवीनतम OnePlus फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा ProXDR AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz इतका आहे. तसेच, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये तुम्हाला 50MP Sony LYT-700 प्राथमिक कॅमेरा, 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तर, आकर्षकी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP Sony IMX480 फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh आणि 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग मिळेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile