OnePlus च्या लेटेस्ट फ्लॅगशिप फोनवर 5000 रुपयांचा Discount, 50MP चे तीन कॅमेरे उपलब्ध

OnePlus 13 फोनवर प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon वर धमाकेदार डील सुरु
फोनवर बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची थेट सूट
OnePlus 13 फोनमध्ये 32MP सोनी IMX615 फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus ने अलीकडेच जानेवारी महिन्यात आपला नवीन प्रिमियम फोन OnePlus 13 लाँच केला होता. लाँचच्या काही महिन्यांनंतर हा फोन मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. होय, या फोनवर प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon वर धमाकेदार डील सुरु आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला 50MP चे तीन कॅमेरे मिळेल. महागड्या स्मार्टफोनवर सवलतीसह हजारो रुपयांची बचत होईल. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus 13 ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: अखेर Google Pixel 9a ची पहिली सेल आज! हजारो रुपयांची बचत करण्याची संधी, पहा टॉप फीचर्स
OnePlus 13 ची किंमत आणि ऑफर्स
OnePlus 13 फोनच्या 24GB RAM आणि 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Amazon वर 92,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. सेल दरम्यान तुम्ही हा फोन आत्ताच स्वस्तात खरेदी करू शकता. डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन आत्ताच Amazon वरून 89,998 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. एवढेच नाही तर, या फोनवर बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची थेट सूट दिली जाईल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
OnePlus 13 चे फीचर्स आणि स्पेक्स
OnePlus 13 फोनमध्ये 6.82-इंच लांबीचा QHD+ AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिझोल्यूशन 3168x 1440 पिक्सेल इतका आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे. वॉटर रेझिस्टन्ससाठी या फोनला IP69 आणि IP68 रेटिंग मिळत आहे. याशिवाय, हा फोन Android 15 आधारित Oxygen OS वर कार्य करतो.
फोटोग्राफीसाठी OnePlus 13 फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. सेटअपमध्ये तुम्हाला 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 50MP चा तिसरा कॅमेरा समाविष्ट आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, या फोनमध्ये 32MP सोनी IMX615 फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. या बॅटरीसह फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. त्याचप्रमाणे, फोनमध्ये 50W जलद चार्जिंग वायरलेस पद्धतीने उपलब्ध आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile