OnePlus 13 च्या अगदी लाँचपूर्वीच Price Leak! आज कुठे आणि केव्हा पाहता येईल LIVE इव्हेंट, वाचा डिटेल्स 

OnePlus 13 च्या अगदी लाँचपूर्वीच Price Leak! आज कुठे आणि केव्हा पाहता येईल LIVE इव्हेंट, वाचा डिटेल्स 
HIGHLIGHTS

OnePlus ची आगामी OnePlus 13 सिरीज आज 7 जानेवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार

फोनचे लाँच तोंडावर असताना या फोनची किंमत ऑनलाइन लीक

जाणून घेऊयात OnePlus 13 सिरीज लाँच इव्हेंट केव्हा आणि कुठे पाहता येईल

प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus ची आगामी OnePlus 13 सिरीज आज 7 जानेवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. या सिरीअंतर्गत OnePlus 13 आणि OnePlus 13R फोन समाविष्ट असतील. मात्र, फोनचे लाँच तोंडावर असताना या फोनची किंमत ऑनलाइन लीक करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फोन Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध असतील. फोनमध्ये ऍडव्हान्स फीचर्स मिळणार आहेत. जाणून घेऊयात OnePlus 13 सिरीजची लीक किंमत, लाँच टाइमलाईन आणि इतर तपशील-

Also Read: Realme 14 Pro Series Launch: नव्या स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट Confirm! अनेक AI फीचर्ससह होणार दाखल

OnePlus 13 भारतीय लीक किंमत

प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने त्याच्या अधिकृत X हँडलवर एक पोस्ट शेअर करत OnePlus 13 ची किंमत ऑनलाइनरित्या लीक केली आहे. त्यानुसार, OnePlus 13 फोनची किंमत 70,999 रुपये असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तर, सेल दरम्यान हा फोन 64,999 रुपयांच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असेल. तर, OnePlus 13R ची अपेक्षित किंमत 40,000 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, फोनची योग्य किंमत हा फोन लाँच झाल्यावरच माहिती होईल.

OnePlus 13 Series Launch Event Today Know how to live stream and expected specs

OnePlus 13 भारतीय लाँच टाइमलाईन

OnePlus 13 सिरीज आज मंगळवार 7 जानेवारी 2025 रोजी हिवाळी लाँच कार्यक्रमात अनावरण केली जाईल. तुमच्यापैकी जे भारतात आहेत ते 9:00 PM IST पासून OnePlus India YouTube चॅनेलवर लाईव्ह स्टर्मिंग पाहू शकतात. एवढेच नाही तर, या इव्हेंटमध्ये कंपनी OnePlus Buds Pro 3 इयरबड्सचा नवीन प्रकार देखील घोषित करेल.

इतर तपशिलांबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus 13 सिरीजला एक मोठा डिझाईन मेकओव्हर मिळत आहे, ज्यामध्ये फ्लॅट डिस्प्लेचा समावेश असेल आणि फोनला अधिक टिकाऊपणा मिळेल. फ्लॅगशिप पॉवर करण्यासाठी कंपनी यात Qualcomm चा नवीन Snapdragon 8 Elite चिपसेट असणार आहे. तर, दुसरे मॉडेल OnePlus 13R स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटसह असण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo