लेटेस्ट OnePlus 13 भारतात लवकरच होणार दाखल! अपेक्षित किंमत आणि फीचर्स, जाणून घ्या सर्व काही..
नवीनतम OnePlus 13 स्मार्टफोन येत्या 7 जानेवारीला लाँच होणार आहे.
यासह कंपनी OnePlus 13R फोन देखील लाँच करणार आहे.
मागील वर्षी OnePlus 12 स्मार्टफोन 64,999 रुपये किमतीत लाँच केला गेला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून टेक विश्वात नवीनतम OnePlus 13 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात 7 जानेवारी 2025 रोजी ही स्मार्टफोन सिरीज लाँच होणार आहे. हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. एवढेच नाही तर, कंपनी OnePlus 13R फोन देखील यासह लाँच करणार आहे. तर, फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह करण्यात आली आहे.
Also Read: आगामी Moto G05 ची लाँच डेट Confirm! मिळेल 50MP Quad Pixel कॅमेरा, जाणून घ्या सर्व तपशील
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, OnePlus 13 फोन भारतापूर्वी चीनच्या बाजारात लाँच करण्यात आला आहे. चिनी बाजारपेठेनंतर आता हा नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप फोन भारतात दाखल होणार आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनशी संबंधित सर्व तपशील-
OnePlus 13 चे भारतीय लॉन्चिंग
नवीनतम OnePlus 13 स्मार्टफोन येत्या 7 जानेवारीला लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कार्यक्रम कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, तुम्हाला कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाँच लाइव्ह पाहता येईल.
It's time to experience unmatched speed, refined craftsmanship, and effortless innovation. Inspired by the Never Settle spirit, get ready to meet the all-new #OnePlus13 Series on January 7, 2025
— OnePlus India (@OnePlus_IN) December 17, 2024
याव्यतिरिक्त, OnePlus 13 स्मार्टफोनशी संबंधित अनेक तपशील लीक करण्यात आले आहे. लीकनुसार, प्रीमियम फोनची किंमत 67,000 ते 70,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. लक्षात घ्या की, मागील वर्षी OnePlus 12 स्मार्टफोन 64,999 रुपये किमतीत लाँच केला गेला होता.
OnePlus 13 चे तपशील
बहुप्रतीक्षित OnePlus फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज असेल. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे, ज्यामध्ये OIS सपोर्ट असेल. तर, पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile