Finally! बहुप्रतीक्षित OnePlus 13 सिरीज भारतात अखेर लाँच, नवे स्मार्टफोन AI फीचर्ससह सुसज्ज, पहा किंमत
OnePlus कंपनीने अखेर आपली बहुप्रतीक्षित OnePlus 13 सिरीज भारतात लाँच केली.
या सिरीज अंतर्गत OnePlus 13 आणि OnePlus 13R स्मार्टफोन भारतात सादर
जाणून घ्या OnePlus 13 सिरीजची किंमत, उपलब्धता, ऑफर्स इ. सर्व माहिती
दीर्घकाळापासून प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus कंपनीने अखेर आपली बहुप्रतीक्षित OnePlus 13 सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत OnePlus 13 आणि OnePlus 13R स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आले आहेत. या फोन्समध्ये मागील मॉडेल्सपेक्षा आणखी सुधारित कॅमेरा, वर्धित वॉटरप्रूफिंग, सुधारित डिझाइन आणि अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर यासह प्रभावी अपग्रेड सादर करण्यात आले आहेत. यासह अनेक AI फीचर्सदेखील नव्या फोन्समध्ये मिळतील. जाणून घेऊयात OnePlus 13 सिरीजची किंमत आणि संपूर्ण तपशील-
OnePlus 13 5G आणि OnePlus 13R 5G ची भारतीय किंमत
Level up your game with the all-new #OnePlus13 – where speed meets intelligence.
— OnePlus India (@OnePlus_IN) January 7, 2025
Get ready to redefine fast, smooth, and seamless like never before.
Sale goes live on 10th Jan!
Know more: https://t.co/RlxONBOfUG pic.twitter.com/AJdpc3qbSv
OnePlus 13 5G च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 12GB + 246GB व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 71,999 रुपये आणि 12GB + 1TB व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 10 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. तर, ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना OnePlus 13 5G च्या खरेदीवर 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
Unleash the power of performance with the #OnePlus13R – built to keep up with your hustle, your gaming, and everything in between.
— OnePlus India (@OnePlus_IN) January 7, 2025
Sale goes live on 13 Jan.
Know more: https://t.co/vqIwB0FRuu pic.twitter.com/Rsb6CNuyR0
दुसरीकडे, OnePlus 13R 5G च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनचा 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिएंटची किमत 49,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 13 जानेवारी 2025 पासून खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना OnePlus 13R 5G च्या खरेदीवर 3,000 रुपयांची त्वरित सूट मिळेल.
OnePlus 13 आणि OnePlus 13R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
OnePlus 13 5G फोनमध्ये 120Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.82-इंच लांबीच्या स्क्रीनसह येतो. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी यात नवीन क्रिस्टल शील्ड अल्ट्रा-सिरेमिक ग्लास देण्यात आला आहे. तर, OnePlus 13R 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, संरक्षणासाठी शीर्षस्थानी कॉर्निंग ग्लास व्हिक्टस 2 साठी समर्थन आहे.
प्रोसेसर
नव्या 12GB RAM सह नवीनतम पॉवरफुल Snapdragon 8 Elite प्रोसेसर OnePlus 13 मध्ये सज्ज आहे. सशक्त कार्यप्रदर्शन आणि सर्व उपकरणांवर अधिक स्मार्ट, अधिक विश्वासार्ह अनुभव देण्याबरोबरच, ही चिपसेट विस्तारित बॅटरी लाईफ साठी कार्यक्षमतेत 27% वाढीचे आश्वासन देते. तीव्र गेमर्ससाठी, डिव्हाइसचे ड्युअल क्रायो-वेलोसिटी कूलर हाय लेव्हल परफॉर्मन्स प्रदान करतात.
OnePlus 13R डिव्हाइस Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC द्वारे समर्थित आहे. यात 16GB पर्यंत RAM आणि 512GB अंतर्गत स्टोरेज आहे.
AI फीचर्स
OnePlus 13 सिरीजमध्ये AI दैनंदिन ऍक्टिव्हिटीज अधिक आनंददायक बनवेल. Google Gemini सह जोडलेले, वापरकर्ते शक्तिशाली AI साधनांच्या ॲरेसह त्यांची कार्यक्षमता वाढवू शकतात.
कॅमेरा
OnePlus 13 5G च्या मागील बाजूस एक ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक OIS कॅमेरा, एक 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आहे. हॅसलब्लाडने कॅमेरा सिस्टीम पुन्हा आकर्षक करण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, समोर 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
दुसरीकडे, OnePlus 13R 5G च्या मागील बाजूस OIS सह 50MP प्राथमिक सेन्सर, OIS सह 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सरसह ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी समोर 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
बॅटरी
OnePlus 13 सिरीजमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात 100W वायर्ड-फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग मिळेल. दुसरीकडे, OnePlus 13R 5G डिव्हाइसमध्ये 80W फास्ट-चार्जिंगसाठी समर्थन असलेली 6000mAh बॅटरी आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile