फ्लॅगशिप किलर OnePlus ने OnePlus 13 5G स्मार्टफोन चीनमध्ये नुकतेच लाँच केला आहे. त्यांनतर, OnePlus चे चाहते कंपनीच्या या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनची प्रतीक्षा भारतीय बाजारात सुद्धा करत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीनतम Snapdragon 8 Elite चिपसेटसह येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. OnePlus च्या या फोनची किंमत भारतात लाँचपूर्वीच लीक करण्यात आली आहे. जाणून घेऊयात OnePlus 13 5G ची लीक किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: फोटोग्राफीसाठी बेस्ट आहेत 108MP कॅमेरासह येणारे Smartphones, किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी
OnePlus 13 5G स्मार्टफोन अनेक व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज आहे. स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 24GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह येतो. ताज्या अहवालानुसार, या स्मार्टफोनची किंमत 53000 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
OnePlus 13 5G स्मार्टफोनची नेमकी किंमत फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची भारतात लाँच तारीख जाहीर केलेली नाही. हा फोन जानेवारी 2024 मध्ये लाँच केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. कंपनी लवकरच स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे.
OnePlus 13 5G स्मार्टफोनमध्ये अपडेटेड कर्व डिस्प्ले आहे. डिस्प्ले साइज 6.82 इंच लांबीचा X2 OLED स्क्रीन 1440p रिझोल्यूशनसह येते, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी हा फोन IP69 रेटिंगसह येतो. हा फोन Android 15 वर आधारित ColorOS 15 वर कार्य करेल. फोनचा भारतीय व्हेरिएंट OxygenOS 15 वर चालेल, अशी अपेक्षा आहे.
त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे, जो OIS सपोर्टसह येतो. यात अल्ट्रा वाइड कॅमेरा सेन्सर देखील आहे.आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे. फोन 10W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो.