प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला OnePlus 13 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन आकर्षक डिझाईन आणि अनेक पॉवरफुल फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. दरम्यान, आज 10 जानेवारी 2025 रोजी OnePlus 13 5G ची सेल भारतात सुरु झाली आहे. पहिल्या सेलदरम्यान या महागड्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. जाणून घेऊयात OnePlus 13 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: नवीनतम Xiaomi Pad 7 टॅबलेट Best AI फीचर्ससह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
नवीनतम OnePlus 13 5G ची किंमत 69,999 रुपयांपासून सुरू होते. तर, या फोनचा दुसरा व्हेरिएंट 76,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. अखेर, या फोनचा टॉप व्हेरिएंटची किमत 89,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा फोन तीन कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल. फोनची पहिली सेल Amazon India वर सुरु झाली आहे.
पहिल्या सेलअंतर्गत OnePlus 13 5G स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची झटपट सूट मिळेल. ही ऑफर फक्त ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास दिली जात आहे. याशिवाय, 180 दिवसांचा फोन रिप्लेसमेंट प्लॅन विनामूल्य उपलब्ध आहे. तर, या फोनवर 7000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
OnePlus 13 5G स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच लांबीचा QHD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे डिव्हाइस सिरेमिक गार्ड संरक्षणासह येते. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm चा नवीनतम चिपसेट Snapdragon 8 Elite प्रोसेसर बसवण्यात आला आहे. तसेच सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या बेस वेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज, दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि तिसरा व्हेरिएंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजद्वारे सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP टेलिफोटो लेन्स आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. ज्यामध्ये पोर्ट्रेट, स्लो मोशन, मल्टी सीन व्हिडीओ असे अनेक कॅमेरा फीचर्स आहेत. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे. फोन 100W SUPERVOOC आणि 50W AIRVOOC चार्जिंग सपोर्टसह येतो. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.