Nothing ने लाँच केला अंधारात चमकणारा Unique स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स
लेटेस्ट Nothing Phone (2a) Plus Community Edition भारतात लाँच
या फोनची विशेषता म्हणजे या Nothing फोनचा बॅक-पॅनल अंधारात देखील चमकतो.
Nothing फोन कम्युनिटीने डिझाइन केला आहे, फोनच्या केवळ 1000 युनिट्सची विक्री होईल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing नेहमीच युनिक आणि पारदर्शक डिझाईनसह स्मार्टफोन्स ऑफर करतो. आता कंपनीने लेटेस्ट Nothing Phone (2a) Plus Community Edition भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची विशेषता म्हणजे या फोनचा बॅक-पॅनल अंधारात चमकतो. या विशेषतेसह हा फोन सहज शोधता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा हँडसेट कम्युनिटीने डिझाइन केला आहे, जो 6 महिन्यांत 47 देशांमध्ये 900 हून अधिक सबमिशननंतर तयार केला गेला आहे. जाणून घ्या सविस्तर-
Also Read: दिवाळी सेलमध्ये Samsung Galaxy A25 5G वर 6000 रुपयांचा Discount, सर्वोत्तम ऑफर्स उपलब्ध
Nothing Phone (2a) Plus Community Edition मध्ये ग्रीन फॉस्फोरेसंट मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे, जो खूप प्रिमियम लुक देतो. Nothing नुसार, या फोनमध्ये कम्युनिटीने तयार केलेले 6 वॉलपेपर उपलब्ध आहेत. लुकबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये केबल्स, पाईप्स आणि मायक्रोचिप्स दिसतात, ज्या अतिशय सुंदररित्या बनवल्या गेल्या आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात Nothing Phone (2a) Plus Community Edition ची किंमत आणि ऑफर्स.
Nothing Phone (2a) Plus Community Edition ची किंमत
Nothing Phone (2a) Plus Community Edition ची किंमत 29,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा फोन केवळ 12GB+256GB स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनचे रजिस्ट्रेशन 12 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून केवळ 1000 युनिट्सची विक्री होईल.
Nothing Phone (2a) Plus Community Edition
Nothing Phone (2a) Plus Community Edition मध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, टच सॅम्पलिंग दर 240Hz इतका आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आला आहे. उत्तम कार्यक्षमतेसाठी यात MediaTek Dimensity 7350 प्रोसेसर देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. सुरक्षेसाठी यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही बसवण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी, या हँडसेटमध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हा मोबाइल फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या उपकरणात 5000mAh ची मजबूत बॅटरी उपलब्ध आहे, जी 50W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, WiFi, GPS, ब्लूटूथ, 4G VoLTE, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile