Price Cut! 50MP सेल्फी कॅमेरासह Motorola Edge 50 Ultra 5G फोन झाला स्वस्त, तब्बल 5000 रुपयांची कपात  

Price Cut! 50MP सेल्फी कॅमेरासह Motorola Edge 50 Ultra 5G फोन झाला स्वस्त, तब्बल 5000 रुपयांची कपात  
HIGHLIGHTS

Motorola Edge 50 Ultra 5G फोनच्या किमतीत मोठी कपात

Motorola Edge 50 Ultra 5G ची किंमत 5000 रुपयांनी कमी केली आहे.

Motorola Edge 50 Ultra 5G फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने अलीकडेच Motorola Edge 50 Ultra 5G फोन स्वस्त झाला आहे. कंपनीने हा फोन भारतात जून महिन्यात लाँच केला होता. अखेर आता दोन महिन्यांनी किंमत कमी करण्यात आली आहे. कंपनीने या फोनच्या किमतीत तब्बल 5000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये दोन 50MP कॅमेरे आणि एक 64MP कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 50MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनची बॅटरी 4500mAh आहे, जाणून घेऊयात Motorola Edge 50 Ultra 5G ची नवी किंमत-

Also Read: Jio वापरकर्त्यांना पुन्हा महागाईचा फटका! दोन लोकप्रिय Nexflix प्लॅन झाले महाग, जाणून घ्या नवीन किंमत

Motorola Edge 50 Ultra 5G फोन झाला स्वस्त

Motorola Edge 50 Ultra 5G किमतीत कपात

Motorola कंपनीने हा प्रीमियम Motorola Edge 50 Ultra 5G फोन 59,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे, या फोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. आता कंपनीने त्याची किंमत 5000 रुपयांनी कमी केली आहे. तुम्ही ते 54,999 रुपयांना खरेदी करू शकता. हा फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन फॉरेस्ट ग्रे, पीच फज आणि नॉर्डिक वुड या तीन कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे. हा फोन नव्या किमतीसह कंपनीच्या अधिकृत साईटवर सूचिबद्ध आहे.

Motorola Edge 50 Ultra 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 50 Ultra फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. संरक्षणासाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस सपोर्ट देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळेल. हा फोन Android 14 वर कार्य करेल.

motorola edge 50 ultra features

फोटोग्राफीसाठी Motorola Edge 50 Ultra 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 64MP पोर्ट्रेट लेन्सचा समावेश आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी, फोनची 4500mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 125W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo