लेटेस्ट Motorola Edge 50 Fusion ची आज पहिली Sale, भारी ऑफर्ससह हजारो रुपयांची होणार बचत। Tech News
Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनची पहिली विक्री आजपासून होणार सुरु
हा 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे.
या सेल दरम्यान फोन खरेदी केल्यावर तुम्हाला ICICI बँक कार्डवर 2000 रुपयांची सूट
Motorola चा नवा Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच झाला. त्यानंतर, स्मार्टफोनची पहिली सेल आज म्हणजेच 22 मे 2024 रोजी सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन अनेक पॉवरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतो. हा 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. पहिल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन खरेदी केल्यास उत्तम ऑफर देखील उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात किंमत आणि ऑफर्स-
Motorola Edge 50 Fusion ची पहिली सेल
नवीनतम Motorola Edge 50 Fusion ची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. फोनच्या 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. तर, 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. हा फोन फॉरेस्ट ब्लू, हॉट पिंक आणि मार्शमॅलो ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या सेल दरम्यान फोन खरेदी केल्यावर तुम्हाला ICICI बँक कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, तुम्ही मासिक हप्त्यांवर देखील फोन खरेदी करू शकता.
Motorola Edge 50 Fusion चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge 50 Fusion 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फुल लांबीचा HD+ pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 7s Gen 2 Octa Core प्रोसेसर सह येतो. सिक्योरिटीसाठी या फोनला IP68 रेटिंग देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये 12GB रॅमसह 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मेन आणि 13MP सेकंडरी सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन पॉवरफुल 5000mAh बॅटरीसह येतो, जो 68W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile