12GB RAM आणि 50MP कॅमेरासह लेटेस्ट Moto G85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
Moto G85 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच झाला आहे.
Moto G85 5G फोन 16,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल.
Moto G85 5G फोनची विक्री 16 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार
Moto G85 5G: नवीनतम Moto G85 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच झाला आहे. हा फोन अनेक उत्कृष्ट फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 3D कर्व pOLED डिस्प्ले आहे. Motorola च्या नवीन स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. हा फोन दोन व्हेरिएंटसह भारतात सादर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात Moto G85 5G स्मार्टफोनची किंमत आणि पॉवरफुल स्पेसिफिकेशन्स-
Also Read: 64MP कॅमेरासह नवा Lava Blaze X 5G फोन भारतात लाँच, बजेट किमतीत मिळतील Powerful फीचर्स
Moto G85 5G ची भारतीय किंमत
वर सांगितल्याप्रमाणे, Moto G85 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल. फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह मिळेल. या फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हे स्मार्टफोन्स कोबाल्ट ब्लू, अर्बन ग्रे आणि ऑलिव्ह ग्रीन कलर ऑप्शन्ससह सादर केले गेले आहेत.
Moto G85 5G वरील ऑफर्स
लाँच ऑफरअंतर्गत हा स्मार्टफोन 16,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल. तर, टॉप व्हेरिएंट 18,999 रुपयांना मिळेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart च्या माध्यमातून केली जाणार आहे. या फोनची विक्री 16 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.
Moto G85 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Motorola च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोनचा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. डिव्हाइस डॉल्बी ATMOS सपोर्टसह येतो.
फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, मॅक्रोसह 8MP डेप्थ कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 33W टर्बोपॉवर चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी तुम्हाला 90 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile