लोकप्रिय आणि प्रसिद्ध Motorola ने आपला नवा स्मार्टफोन Moto G45 5G भारतीय बाजारात अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, Moto G45 5G फोनची पहिली विक्री आज 28 ऑगस्ट 2024 पासून भारतात सुरू झाली आहे. हा फोन कंपनीने बजेट विभागात सादर केला आहे. या किमतीत फोनमध्ये 50MP कॅमेरा, 8GB RAM, 5000mAh बॅटरी इ. फीचर्स मिळणार आहेत. जाणून घ्या Moto G45 5G ची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
Moto G45 5G ची पहिली विक्री आज दुपारी 12 वाजतापासून Flipkart वर सुरू झाली आहे. Moto G45 5G च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने हा स्मार्टफोन 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या टॉप वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. हा फोन ब्रिलियंट ब्लू, ब्रिलियंट ग्रीन आणि व्हिवा मॅजेन्टा या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Moto G45 5G वरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये या स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. ही ऑफर केवळ Axis आणि IDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असणार आहे.
Moto G45 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच लांबीचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या नवीन 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर आहे. हा या विभागातील सर्वात वेगवान 5G फोन आहे, असे कंपनीने सांगितले आहे. या स्मार्टफोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचा पर्याय उपलब्ध आहे. फोनची रॅम 16GB पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच, मायक्रो SD कार्ड स्लॉटसह स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी Moto G45 5G स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP सेकंडरी सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 16MP सेन्सरने सुसज्ज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनसोबत 20W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.