लेटेस्ट Moto G35 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी
Motorola चा नवीनतम Moto G35 5G स्मार्टफोन भारतात लाँच
Moto G35 5G फोन कंपनीने 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे.
Moto G35 5G फोनमधील कॅमेरा सेटअप 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola चा नवीनतम Moto G35 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने अलीकडेच या स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली होती. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट किमतीमध्ये लाँच केला. हा फोन कंपनीने 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे. या फोनमध्ये मोठा डिस्प्ले आणि 50MP रियर कॅमेरा सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. चला तर मग Motorola G35 5G स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात-
Also Read: BSNL Plan: दीर्घकाळ वैधतेसह मिळेल तब्बल 252GB डेटा, जाणून घ्या किंमत आणि बेनिफिट्स
Moto G35 5G ची किंमत
Super stoked to introduce #MotoG35 5G🚀Fastest* 5G with 12 bands, smooth 120Hz FHD+ display, 50MP Quad Pixel camera, 16MP selfie stunner & vegan leather swag in Pantone colors — affordable is cool😎Launching today at ₹9,999/- @Flipkart | https://t.co/azcEfy2uaW | leading stores. pic.twitter.com/QYvzda09c7
— Motorola India (@motorolaindia) December 10, 2024
वर सांगितल्याप्रमाणे, Motorola ने नवा Moto G35 5G स्मार्टफोन भारतात दाखल केला आहे. या फोनची किंमत कंपनीने 9,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनची विक्री 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होणार आहे.
Moto G35 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Moto G35 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, फोनचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz इतका आहे. याव्यतिरिक्त, हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Unisoc T760 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम बूस्ट करता येईल.
फोटोग्राफीसाठी, या फोनच्या मागील बाजूस 50MP क्वाड पिक्सेल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. हा कॅमेरा सेटअप 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. त्याबरोबरच, या फोनच्या मागील बाजूस 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरसह 50MP मुख्य सेन्सर मिळेल. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, लेटेस्ट 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 20W चार्जिंगच्या समर्थनासह येते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile