एक नव्हे तर दोन डिस्प्लेसह देशी कंपनीचा नवीनतम Lava Agni 3 5G फोन लाँच, जाणून घ्या किंमत

Updated on 04-Oct-2024
HIGHLIGHTS

'India’s 1st dual AMOLED Display' स्मार्टफोन भारतात लाँच

देशी कंपनीचा नवा Lava Agni 3 फोन भारतीय बाजारात अखेर लाँच

हा एक ड्युअल डिस्प्ले फोन आहे, ज्याच्या पुढील आणि मागील दोन्ही पॅनलवर स्क्रीन आहेत.

प्रसिद्ध भारतीय मोबाइल कंपनी LAVA ने आज ‘Agni’ सिरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन Lava Agni 3 5G सादर केला आहे. कंपनीने हा फोन ‘India’s 1st dual AMOLED Display’ स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला पुढील आणि मागील दोन्ही बाजूस AMOLED स्क्रीन मिळेल. हा पॉवरफुल आणि प्रीमियम स्मार्टफोन लावा अग्नी 3 ने फोन इतर कंपन्यांच्या मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन्सना जबरदस्त टक्कर देईल. होय, हा फोन कंपनीने माध्यम श्रेणीत सादर केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Lava Agni 3 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Amazon GIF Sale दरम्यान महागडे फोल्डेबल फोन्स निम्म्या किमतीत उपलब्ध, पहा Best ऑफर्स

Lava Agni 3 5G ची किंमत

Lava Agni 3 फोन 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस वेरिएंटची किंमत 22,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. लक्षात घ्या की, जे वापरकर्ते फोनसह चार्जिंग ॲडॉप्टर खरेदी करू इच्छित नाहीत, त्यांना 2,000 रुपयांपेक्षा कमी म्हणजे 20,999 रुपयांमध्ये बेस व्हेरिएंट मिळेल. कंपनीने Lava Agni 3 5G फोन Heather Glass आणि Pristine Glass कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल.

‘India’s 1st dual AMOLED Display’ फोन

Lava Agni 3 चा लुक इतरांपेक्षा वेगळा आणि अगदी विशेष आहे. हा एक ड्युअल डिस्प्ले फोन आहे, ज्याच्या पुढील आणि मागील दोन्ही पॅनलवर स्क्रीन आहेत. फोनचा सेकंडरी डिस्प्ले मागील कॅमेरा सेटअपमध्ये इन्स्टॉल करण्यात आला आहे. ज्याला कंपनीने ‘इंस्टा स्क्रीन’ असे नाव दिले आहे. या छोट्या स्क्रीनवर AMOLED पॅनलचा वापर करण्यात आला आहे.

लेटेस्ट Lava Agni 3 च्या सेकंडरी स्क्रीनवरून कॉल, मॅसेज आणि इतर नोटिफिकेशन्स पहिले आणि ऍक्सेस करता येतील. एवढेच नाही तर फोनमधील मीडिया कंटेंटही या डिस्प्लेवरून प्ले केला जाईल. फोनचा कॅमेरा या इन्स्टा स्क्रीनद्वारे ऑपरेट करता येईल, ज्यामुळे वापरकर्ते मागील कॅमेरा सेटअपमधून सेल्फी देखील क्लिक करण्यास सक्षम असतील.

Lava Agni 3 चे फीचर्स आणि स्पेक्स

Lava Agni 3 5G फोन 6.78-इंच लांबीच्या 1.5K डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही 3D कर्व AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. Lava ने आपला मोबाईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज केला आहे. Netflix आणि OTT ॲप्सवर चित्रपट, वेब सिरीज पाहण्यासाठी Widevine L1 सपोर्ट देखील आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 7300X octa-core प्रोसेसरवर लॉन्च करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे. फोनच्या मागील पॅनलवर, LED फ्लॅशसह सुसज्ज 50MP Sony IMX766 OIS सेन्सर आहे जो 8MP अल्ट्रावाइड आणि 8MP टेलिफोटो लेन्ससह एकत्र काम करतो. या कॅमेरामध्ये 3X ऑप्टिकल झूम, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि EIS सपोर्ट देखील आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट सॅमसंग सेन्सर आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :